मुक्तपीठ टीम
ओला इलेक्ट्रिकने एन एम सीने २१७०, भारतात बनवलेला लिथियम-आयन सेल सादर केला आहे. सेलबद्दल माहिती देताना ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की, हा सेल ईव्ही क्रांतीचे केंद्र आहे. ओला जगातील सर्वात प्रगत सेल तयार करत आहे जे आम्हाला जगातील सर्वात प्रगत आणि किफायतशीर इलेक्ट्रिक वाहन वेगाने विस्तारण्यास, नाविन्य आणण्यास आणि तयार करण्यात मदत करेल.
२०२३ पर्यंत उत्पादन सुरू होईल
- २०२३ पर्यंत ओला आपल्या गिगाफॅक्टरीमधून सेलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करेल.
- ओलाच्या या शोधामुळे भारतातील लि-आयन बॅटरीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
- ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट २०२१ मध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली.
- कंपनी पहिली इलेक्ट्रिक कार विकसित करत आहे.
ओला एस१ प्रो चे खास फिचर्स…
- ओला एस१ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला ३.९७ के डब्ल्यु एच क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आहे.
- बॅटरी पॅक ८५०० वॅट मिड ड्राइव्ह आयपाएम इलेक्ट्रिक मोटरसह येते.
- एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की ती १८१ किमी पर्यंत चालते.
- कंपनीने स्कूटरमध्ये हाय स्पीडचे फीचरही दिले आहे.
- एस१ प्रो आता मुव्ह ओएस २.० सह उपलब्ध आहे
- यामध्ये इको मोड, म्युसीक प्लेबॅक, नेव्हिगेशन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, मोबाइल अॅपद्वारे कीलेस लॉक/अनलॉक आणि बरेच काही समाविष्ट आहे.
- स्कूटरवर अजूनही क्रूझ कंट्रोल उपलब्ध नाही.
- या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देखील जोडण्यात आले आहे.
- त्यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्सची सुविधा देखील देण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ: