मुक्तपीठ टीम
स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक कंपनी रिव्हॉल्टने एक खास सुविधा सादर केली आहे. आता रिव्हॉल्ट आरव्ही ३०० आणि रिव्हॉल्ट आरव्ही ४०० सारख्या जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक मोबाईलद्वारेही स्टार्ट करू शकता. हे स्मार्टफोन अॅप द्वारे शक्य होईल. रिव्हॉल्टच्या बाईकमध्ये असे फिचर आणल्याने आता वापरकर्त्यांना खूप सोपे होईल आणि ते इतर कुठेही स्पर्श न करता अगदी बाईकपासून दूर राहूनही इंजिन सुरू किंवा बंद करू शकतात.
आता उत्पादन पुन्हा सुरू
- रिव्हॉल्ट मोटर्सनी कोरोना काळात आपल्या बाईकचे उत्पादन थांबवले होते, ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
- कंपनी येत्या काळात इलेक्ट्रिक बाईक्सची संख्या वाढवेल.
- रिव्हॉल्ट आरव्ही ४०० ची बुकिंग आता पुन्हा सुरू झाले आहे.
- परवडणारी किंमत आणि चांगली बॅटरी रेंज तसेच स्टायलिश लूकमुळे, रिव्हॉल्टच्या इलेक्ट्रिक बाईक्सची भारतात बम्पर विक्री होत आहे. भारतीय कंपनी असल्याने वरून लोकही आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.
- आता सगळीकडेच इलेक्ट्रिक बाईक भारताच्या रस्त्यांवर धावताना दिसतील.
जबरदस्त बाईक आता कमी किंमत!
- रिव्हॉल्ट कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी व्होल्ट (व्हेईकल ऑनलाईन ट्रॅकिंग) सुविधा आणली आहे.
- ज्यामध्ये मागणी आणि पुरवठा याची माहिती उपलब्ध आहे.
- यासह, अलीकडील किंमतीमध्ये कपात केल्यामुळे, दिल्लीतील रिव्हॉल्ट आरव्ही ४०० ची एक्स-शोरूम किंमत आता ९०,७९९ रुपये झाली आहे.
- जी आधी १,१८,९९९ रुपये होती.
- त्याच वेळी, ही बाईक अहमदाबादमध्ये फक्त ८७,००० रुपयांना खरेदी करू शकता.
- फेम इंडिया योजनेअंतर्गत, इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटरवर सबसिडी मिळणार आहे.