मुक्तपीठ टीम
कोरोनानंतर व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. वेबकॅमच्या मदतीने आपण कोणाशीही कधीही बोलू शकतो. डिजिटायझेशनच्या युगात मोबाईल फोन नाही अशी एकही व्यक्ती नाही. अशा परिस्थितीत मोबाईलला वेबकॅम बनवा. चला जाणून घेवूया सोप्या स्टेप्स ज्याद्वारे मोबाईल फोन वेबकॅम म्हणून वापरू शकतो…
हे अॅप इन्स्टॉल करा आणि मोबाईला वेबकॅम बनवा…
वेबकॅम म्हणून मोबाईल फोन वापरण्यासाठी,
- सर्वप्रथम मोबाईलमध्ये Camo अॅप किंवा Droidcam अॅप किंवा त्याची क्लायंट वर्जन इंस्टॉलर अॅप इन्स्टॉल करा.
- हे अॅप तुम्हाला मोबाइल फोन आणि डेस्कटॉप दोन्हीमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
- यानंतरच तुम्ही सहजपणे व्हिडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता.
कसे कराल कनेक्ट?
- यूएसबीच्या मदतीने कनेक्ट करा.
- अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर USB वापरून PC ला कनेक्ट करा.
- आता काही पर्याय दिसतील.
- येथे डेव्हलपर आणि कॅमेरा पर्यायांवर डेव्हलपर आणि कॅमेरावर क्लिक करा.
- यानंतर मोबाइल आणि डेस्कटॉपवर इन्स्टॉल केलेल्या अॅपशी कनेक्ट करा.
- येथे पुन्हा एक पर्याय दिसेल, त्यानंतर USB चा पर्याय निवडा आणि व्हिडिओ आणि ऑडिओचा पर्याय निवडा.
- दिलेल्या स्टेप्स केल्यानंतर, PCमध्ये एक नवीन विंडो दिसेल, नंतर कॅमेरा आणि ऑडिओ सुरू होईल.