Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजिटल रुपयामुळे नेमका कोणता फायदा…..

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, कायदा-पोलीस
0
digital-rupee

मुक्तपीठ टीम

अर्थव्यवस्था आणि देयक प्रणालीच्या विकासाबरोबरच पैशाच्या व्यवहाराच्या पद्धती आणि स्वरूपामध्येही बदल झाला आहे. पूर्वी जेथे व्यवहारासाठी वस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा होती, कालांतराने त्याची जागा धातूच्या पैशाने घेतली आणि नाण्यांचा वापर होऊ लागला. यानंतर ते कागदी चलनात आले. आजही जगातील बहुतेक देशांतील व्यापार व व्यवहार कागदी चलनाद्वारेच होतात. पण डिजिटायझेशनला जसजशी गती मिळत आहे, तसतशी डिजिटल चलन स्वीकारण्याची मान्यता वाढत आहे. जरी, डिजिटल चलनाचा ट्रेंड अजूनही फार कमी देशांमध्ये आहे, परंतु अनेक देश त्याच्याबरोबर पुढे जाण्याच्या तयारीत आहेत. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाही डिजिटल रुपयासह पुढे जाण्याच्या तयारीत आहे.

देशाची डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल…

  • देश वेगाने डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
  • भारताने आपली पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट १ नोव्हेंबर २०२२ रोजी लाँच केला आहे.
  • रिझर्व्ह बँक भारतात डिजिटल चलनाची म्हणजेच डिजिटल रुपयाची चाचणी करत आहे.
  • मात्र, रिझर्व्ह बँकेने नुकताच होलसेल सेगमेंट लक्षात घेऊन डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे.
  • रिटेल सेगमेंटसाठी डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट महिनाभरात सुरू होणार आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या मते, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल चलन हे एक कायदेशीर चलन आहे, जे केंद्रीय बँकेने डिजिटल स्वरूपात जारी केले आहे. हे कागदी किंवा भौतिक चलनासारखेच आहे आणि कागदी चलनासह त्याची देवाणघेवाण शक्य आहे. फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे.

डिजिटल चलनाचे दोन प्रकार असणार!

  • रिझर्व्ह बॅंकेने डिजिटल चलन म्हणजेच ई-रुपी दोन प्रकारांमध्ये विभागले आहे
  • पहिलं म्हणजे सीबीडीसी-डब्ल्यू आणि सीबीडीसी-आर आहे. डब्ल्यूचा अर्थ होलसेल तर, आरचा अर्थ रिटेल असा आहे.
  • रिटेल सीबीडीसी सर्वांसाठी वापरण्यासाठी उपलब्ध असेल. हे सर्व खासगी, गैर-आर्थिक ग्राहक आणि व्यवसायांद्वारे वापरले जाऊ शकते.
  • तर, होलसेल सीबीडीसी निवडक वित्तीय संस्थांसाठी वापरला जाईल.

डिजिटल चलनाचे फायदे

  • डिजिटल रुपयाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
  • अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत सीबीडीसीचे अनेक फायदे सांगितले होते.
  • चौधरी यांच्या मते, डिजिटल रुपयामुळे केवळ रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर सीबीडीसी अधिक मजबूत, कार्यक्षम, विश्वासार्ह, नियमन केलेला आणि कायदेशीर पेमेंट पर्याय तयार करेल.
  • हे चलन देशभर लागू झाल्यानंतर, सर्वात मोठा फायदा हा होईल की लोकांना त्यांच्याकडे रोख ठेवण्याची गरज भासणार नाही.
  • हे चलन सुरू झाल्यामुळे, सरकारसोबतच्या सामान्य लोकांच्या आणि व्यवसायांच्या व्यवहारांची किंमत कमी होईल आणि सरकारला अधिकृत नेटवर्कमध्ये सर्व व्यवहार उपलब्ध होतील.
  • यासोबतच बनावट नोटांच्या समस्येपासूनही सुटका होणार आहे.
  • डिजिटल चलन जारी झाल्यानंतर कायमचे राहील आणि ते कधीही खराब होणार नाही.
  • लोक ते मोबाईल वॉलेटमध्ये ठेवू शकतील. एवढेच नाही तर ते बँकेतील पैसे आणि रोख रकमेतही सहज रुपांतरित होऊ शकते.

Tags: Digital CurrencyDigital RupeemuktpeethReserve Bank of Indiauseful newsउपयोगी बातमीघडलं-बिघडलंडिजिटल चलनडिजिटल रुपयाभारतीय रिझर्व्ह बॅंकमुक्तपीठ
Previous Post

एका पित्याचा संघर्ष…अखेर १७ वर्षांपूर्वी बेपत्ता मुलासाठी एसआयटी स्थापन!

Next Post

आता स्मार्टफोनलाही बनवा वेबकॅम! फॉलो करा या स्टेप्स…

Next Post
wEBCAMERA

आता स्मार्टफोनलाही बनवा वेबकॅम! फॉलो करा या स्टेप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!