Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता फास्टॅग खात्यातूनच मिळणार टोल मासिक पास

April 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Fastag

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई प्रवेश नाक्यावरील ५ टोल नाक्याचे मासिक पासधारकांना २७ एप्रिल २०२१ पासून फास्टॅग मध्येच मासिक पास मिळणेची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली आहे.

मुंबईचे प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक पास घेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग मध्येच मासिक पास देणेच्या योजने बाबत सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले की, पथकर नाक्यावर प्रत्यक्ष जावून रोख रक्कम देवून मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पध्दतीत बदल करुन त्या ऐवजी बँकेस ऑन लाईन पध्दतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅग साठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल. तसेच यापूढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे आवश्यक आहे.

म.रा.र.वि.महामंडळ, आय सी आय सी आय बँक व मे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (कंत्राटदार) यांच्यामध्ये झालेला करारनाम्यानुसार ही सुविधा देण्यात येणार आहे. वाहनधारकासाठी ऑनलाईन पध्दतीमध्ये २ पर्याय उपलब्ध आहेत पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org व दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येते व मिळणाऱ्या पावतीवरील Authorization क्रमांक संबधित पथकर नाक्यावर ३ दिवसाचे आत जावून त्यानुसार मासिक पास कार्यान्वित (Activate) करुन घ्यावा लागेल. मुदतीत Activation न केल्यास पास आपोआप रद्द होवून तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.

उक्त सुविधेबाबत अधिकची माहिती देताना पथकर प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक, कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेमुळे साधारणपणे २२ हजार ते २५ हजार वाहन धारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबई पथकर नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेश द्वारावरील ४ पथकर नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे.
राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजुच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेन मध्ये बदलण्याचा २६ जानेवारी चा पहिला प्रयोग यशस्वी झालाआहे, त्यानुसार वाशी, ऐरोली येथील पथकर नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅग मध्ये रुपांतरीत करणेचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत होईल व त्यामुळे मुंबई नाक्यांवर वाहनधारकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल.

महामंडळाकडून मुंबई प्रवेशद्वाराचे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.


Tags: fastagmumbaitoll plazasफास्टॅगविजय वाघमारे
Previous Post

मुंबईचा अधिकारी मनाचा मोठा, कोरोना केंद्रासाठी बंगला दिला!

Next Post

सरकारी तज्ज्ञाने दिला होता ऑक्सिजन अलर्ट…केंद्र सरकारनं नाही बनवला प्लान बी!

Next Post
oxygen

सरकारी तज्ज्ञाने दिला होता ऑक्सिजन अलर्ट...केंद्र सरकारनं नाही बनवला प्लान बी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!