Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी तज्ज्ञाने दिला होता ऑक्सिजन अलर्ट…केंद्र सरकारनं नाही बनवला प्लान बी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
oxygen

मुक्तपीठ टीम

देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची देशात टंचाई निर्माण झाली आहे. आता सरकारकडून तातडीच्या उपयायोजनांच्या माध्यमातून ती दूर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मात्र, मुळात ही परिस्थिती केवळ दुर्लक्षातून झाल्याचे समोर येत आहे. कारण या संभाव्य ऑक्सिजन टंचाईबद्दल केंद्र सरकारला अलर्ट करण्यात आलं होतं. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दहा दिवसांपूर्वीच संभाव्य संकटाकडे लक्ष वेधले होते, “ऑक्सिजनची व्यवस्था करा, कारण २० एप्रिलपर्यंत दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख होईल आणि एप्रिलअखेरीस ती पाच लाखावर जाईल.”

डॉ. पॉल यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर इशारा दिला होता की कोरोनाचे स्वरूप अधिक गंभीर होणार आहे. देशाला अधिक वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची आवश्यकता भासेल. ते म्हणाले की रोज होणार्‍या संसर्गाची संख्या सहा लाखांपर्यंत जाऊ शकते. अशा विलक्षण परिस्थितीत प्लान बी अंतर्गत वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या गटाच्या बैठकीत डॉ. पॉल यांनी सरकारला प्लान बीचीही चौकशी करण्याची विनंती केली होती, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

डॉ. पॉल यांनी सुचवलेला प्लान बी नेमका काय होता हे स्पष्ट नाही. पण बहुधा देशांतर्गत उपलब्ध ऑक्सिजन कमी पडेल हे लक्षात घेऊन पर्यायी ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था तयार ठेवण्यासाठीच प्लान बी सुचवला असावा. तो अंमलात आणला गेला असता तर गेले काही काही दिवस देशात भेडसावत असलेली ऑक्सिजनची तीव्र टंचाई जाणवली नसती आणि अनेकांचे ऑक्सिजन अभावी बळीही गेले नसते, असे म्हटले जाते.


Tags: Dr.V.K Pauloxygenऑक्सिजनडॉ. व्ही. के. पॉलप्लान बी
Previous Post

आता फास्टॅग खात्यातूनच मिळणार टोल मासिक पास

Next Post

भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नवे कोरोना सेंटर्स

Next Post
devendra fadnavis

भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नवे कोरोना सेंटर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!