मुक्तपीठ टीम
मुंबईतील क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवनवीन गौप्यस्फोट उघड होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पक्षकार परिषद घेत एनसीबी व भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असा गौप्यस्फोट केला आहे.
- ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस ते नागपूरमध्ये बोलत होते.
- “एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं.
- यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं.
- मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं.
- ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे.
- याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे.
- पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे.
- खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता.
- तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही.
- तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे.
- ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही
नवाब मलिकांचा आरोप
- अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ९ ऑक्टोबरला एनीसबीने क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
- त्यांनी राज्य सरकार तसेच बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला.
- तसेच या कारवाईत पकडण्यात आलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आले.
- युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव लावतात.
- त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत.
- त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे.
- मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेले होते.
- समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं.