Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक बुडाल्यास ग्राहकांची ५ लाखांपर्यंतची रक्कम सुरक्षित!

आधीची एक लाखाची मर्यादा वाढवली, ३ महिन्यात पैसे देण्याचेही बंधन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nirmala sitaraman

मुक्तपीठ टीम

बॅंक बंद झाल्यास आपल्याला खात्यातील रक्कम पुन्हा मिळणार का? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात असतो. मात्र आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ठेवी आणि पत हमी निगम कायदा (डीआयसीजीसी) दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर बॅंक बंद झाल्यास ग्राहकांची ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित असणार आहे तसंच ठेवीदारांना ही रक्कम ९० दिवसांच्या आत परत करण्यात येईल. त्यामुळे यापूर्वीची एक लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख करण्यात आली आहे.

 

मागील वर्षी सरकारने ठेवीची मर्यादा पाच पट वाढण्याची घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने या घोषणेला दुजोरा दिला असला तरी संसेदेची मंजुरी अद्याप ऐरणीवरच आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले आहे.

  • २०२०मध्ये पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक बुडाल्यानंतर ठेवी विमा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी डीआयसीजीसी दुरुस्ती कायद्याची घोषणा केली होती.
  • मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात आला.
  • आज २७ वर्षानंतर सरकारने ठेवी विमा आणि पत हमी निगम कायद्यात बदल करण्यास मंजुरी दिली आहे.

 

काय आहे डीआयसीजीसी कायदा?

  • हा कायदा 1961,16(1) कलम नुसार आहे.
  • एखादी बॅंक बुडाली अथवा बंद झाल्यास डीआयसीजीसी प्रत्येक बॅंक ग्राहकांना पैसे परत करण्यास जबाबदार असेल.
  • ठेवीदारांनी जमा केलेली रक्कम ही १ लाख विमा संरक्षणाखाली असते, आता ही मर्यादा वाढवून ५ लाख केली आहे.
  • ठेवी विमाअंतर्गत ग्राहकांचे ५ लाख रुपये सुरक्षित असतील. मात्र ग्राहकांचे एकाच बॅंकेच्या अनेक शाखांमध्ये रक्कम जमा असेल तर, व्याज जोडून फक्त ५ लाख रुपये रक्कम सुरक्षित मानली जाईल.
  • बॅंकेत ठेवी जमा करत असताना ग्राहकांना तपशील देण्यात येतो.
  • त्या तपशीलाबद्दल जाणून घेण्यासाठी ग्राहक शाखेच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करु शकतात.

 

विमा सरंक्षण वाढीमुळे बॅंक ग्राहकांना फायदा झाला आहे. पण, १०० रुपयांचा प्रिमियम १० पैशांवरून १२ पैसे झाला आहे. हमी रक्कम वाढवल्यामुळे ग्राहकांची चिंता मिटून त्यांचा संबंधित बॅंकेवर विश्वास वाढेल. तसेच बॅंक अनेक ग्राहकांना कर्ज देऊ शकते.


Tags: bank depositsbanksfinance minister nirmala sitharamanकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनविमा सरंक्षण वाढ
Previous Post

लाखो शेतकऱ्यांना परत करावा लागणार ‘किसान सन्मान निधी’

Next Post

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शु्क्लांच्या दाव्यामुळे कोण अडचणीत येणार?

Next Post
Rashmi Thackeray

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शु्क्लांच्या दाव्यामुळे कोण अडचणीत येणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!