Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीने जपान हादरलं! रेल्वेसेवा विस्कळीत, लोकांची पळापळ

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
North-korea-dictator-fired-missiles-over-japan

मुक्तपीठ टीम

एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आता उत्तर कोरियाने संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवले आहे. उत्तर कोरियाने प्रशांत महासागरातून जपानवरून क्षेपणास्त्र डागले. कोणताही इशारा न देता उत्तर कोरियाच्या या आक्रमक वृत्तीनंतर जपानमध्ये खळबळ उडाली असून जपानमध्ये धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजले. सायरन वाजल्यानंतर जपानी नागरिकांनी भूमिगत ठिकाणी आसरा घेतला. तर, देशातील उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. उत्तर कोरियाने मागील १० दिवसात पाचवे क्षेपणास्त्र डागले. जपानसह दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पाणबुडीविरोधी सराव केला. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

उत्तर कोरियाने केलेली ही सर्वात महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी !!

  • उत्तर कोरियाने मंगळवारी (जपानी वेळ ४ ऑक्टोबर) पाच वर्षांत प्रथमच जपानवर मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागले.
  • त्यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली.
  • प्रशासनाला लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगावे लागले.
  • गाड्या थांबवण्यात आल्या.
  • जपानने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत केलेल्या लष्करी अभ्यासानंतर उत्तर कोरियाने विरोध करण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या सुरू केल्याचे समजते.
  • जानेवारीनंतर उत्तर कोरियाने केलेली ही सर्वात महत्त्वाची क्षेपणास्त्र चाचणी होती.
  • जानेवारीमध्ये त्यांनी गुआमच्या यूएस क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास सक्षम असलेले ह्वासॉन्ग-12 मध्यवर्ती-श्रेणीचे क्षेपणास्त्र सोडले.
  • यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा बैठक बोलावली होती.

जपानकडून या चाचणीचा निषेध!!

  • उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर जपानने या चाचणीचा निषेध केला आहे.
  • कीशिदा म्हणाले ही एक क्रूर कृती आहे.
  • क्षेपणास्त्र डागल्या नंतर जपान पंतप्रधान कार्यालयाने उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून गेले असल्याचे ट्वीट केले.
  • उत्तर कोरिया आणि जपान यांच्यातील संबध ताणले गेल्याने भविष्यात यावरून दोन्ही देशात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

दहा दिवसांत पाचवी क्षेपणास्त्र चाचणी

  • उत्तर कोरियाने १० दिवसांत ही पाचवी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.
  • उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राचा शोध जपानी तटरक्षक दल आणि दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने लावला.
  • यानंतर उत्तर जपानमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • ईशान्येकडील होक्काइडो आणि आओमोरी भागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Tags: JapanNorth Koreaउत्तर कोरियाक्षेपणास्त्र चाचणीजपान
Previous Post

GT Force E-Scooter: ५० हजारांपेक्षाही कमी किंमतीत ई-स्कूटर!

Next Post

महागाईचं सीमोल्लंघन: स्टेट बँकेने वाढवले गृहकर्जाचे दर, इतर बँकाही वाढवणार!

Next Post
sbi

महागाईचं सीमोल्लंघन: स्टेट बँकेने वाढवले गृहकर्जाचे दर, इतर बँकाही वाढवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!