Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मधमाश्यांच्या पोळ्याच्या रचनेवर आधारित ध्वनी नियंत्रण शीट अब्सॉर्बरची निर्मिती

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
bee

मुक्तपीठ टीम

एका भारतीय संशोधकाने ध्वनी शोषक पॅनेल म्हणून मधमाशांच्या पोळ्यासारख्या असलेल्या कागदाच्या शीट आणि पॉलिमर रचना तयार केल्या असून ध्वनीप्रवाह उर्जेचे लो फ्रिक्वेन्सीमध्ये रुपांतर करणारी पॅनेल म्हणून त्यांचा वापर करता येईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग ध्वनीप्रवाह नियंत्रण प्रणाली तयार करण्यासाठी त्याचबरोबर पर्यावरणीय गोंगाट नियंत्रणासाठी होणार आहे. नेहमी वापरली जाणारी सामग्री हाय फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत असे. मात्र, मधमाशांचे नैसर्गिक पोळे त्यांच्या भूमितीय रचनेमुळे हाय फ्रिक्वेन्सी बरोबरच लो फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठी देखील प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले.

 

या संदर्भातील सैद्धांतिक विश्लेषण आणि प्रयोगाद्वारे केलेल्या तपासणीतून असे दिसून आले की अशा प्रकारच्या रचना ध्वनीप्रवाह उर्जेचे कंपन उर्जेत रुपांतर करतात. या रचनांमध्ये असलेल्या भितींमध्ये ओलावा टिकवण्याच्या गुणधर्मामुळे या कंपन उर्जेतून उष्णता निर्माण होऊ लागत असल्याचेही दिसून आले. हा गुणधर्म कृत्रिम पद्धतीने विकसित केल्यास ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी एक अतिशय किफायतशीर अभियांत्रिकी उपाययोजना उपलब्ध होऊ शकते.

 

हैदराबाद आयआयटीच्या मेकॅनिकल ऍन्ड एरोस्पेस इंजिनियरिंग विभागात अध्यापक असलेले डॉ. बी वेंकटेशम आणि डॉ. सूर्या यांनी बायोमिमेटिक डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर करून या गुणधर्मावर आधारित कमी जाडीची परंतु अतिशय मजबूत असलेली अकौस्टिक पॅनेल्स तयार केली आहेत. मधमाशांच्या पोळ्यांमध्ये ध्वनीप्रवाह उर्जा नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असलेले भौतिक विज्ञान समजून घेणे आणि त्या रचनेची नक्कल तयार करणे याचा या तंत्रज्ञानात समावेश आहे. या संशोधकांच्या टीमने एक गणितीय मॉडेल तयार केले आणि योग्य त्या मापदंडांची गणना केली आणि त्यानंतर त्या आधारे ही रचना तयार केली. सुरुवातीला काही नमुने तयार केल्यावर तशाच प्रकारचे जास्त नमुने बनवण्यात आले. प्रारंभिक रचना (प्रोटोटाईप) तयार करताना त्यांनी दोन वेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा वापर केला. एका रचनेत विस्तारापूर्वीचे मधमाशीचे पोळे जसे तयार होते त्या प्रक्रियेद्वारे कागदी पोळे बनवण्यात आले तर दुसरी रचना हॉट वायर तंत्रज्ञानावर आधारित पॉलिमर पोळ्याची होती.

 

पॉलिप्रोपिलिन स्ट्रॉचे ढीग तुकड्यांमध्ये कापून ही पॅनेल तयार करण्यात आली. हॉट वायरने हे तुकडे कापले जात असल्याने ते स्ट्रॉ एकमेकांना चिकटवतही होते. हे तंत्रज्ञान ध्वनीप्रवाह उर्जेचे उत्सर्जन करणारी कमी जाडीची आणि जास्त मजबुती असलेली पॅनेल तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.


Tags: beehiveiitNoise Pollution Control Sheet Absorberआयआयटीध्वनी नियंत्रण शीटहैदराबाद
Previous Post

इंधन उद्योगातील दोन मोठे समूह ई-चार्जिंगच्या नव्या क्षेत्रात, देशभर सुविधा उभारणार!

Next Post

सुवर्ण पदक विजेता नीरजची नवी स्वप्नपूर्ती, आई-वडिलांना विमानाने नेण्याची इच्छा पूर्ण!

Next Post
neeraj sharma

सुवर्ण पदक विजेता नीरजची नवी स्वप्नपूर्ती, आई-वडिलांना विमानाने नेण्याची इच्छा पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!