Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंधन उद्योगातील दोन मोठे समूह ई-चार्जिंगच्या नव्या क्षेत्रात, देशभर सुविधा उभारणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Jio-BP

मुक्तपीठ टीम

सध्याचा काळ हा पारंपरिक इंधनांचा वापर टाळत सोलर, पवन अशा अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणारा. त्यामुळे वर्तमानातील इंधनाच्या फायदेशीर व्यवसायात असणाऱ्या मोठ्या दिग्गजांनी आता अपारंपरिक उर्जा क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सने सोलर पॅनलच्या उद्योगाकडे पाऊल उचलले असतानाच आता देशभर ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या बाजारपेठेवरही लक्ष दिले आहे. ब्रिटनमधील ब्रिटिश पेट्रोलियमला सोबत घेत रिलायन्सने या नव्या बाजारपेठेत मुसंडी मारण्याची योजना आखली आहे.

ई-चार्जिंगची बिझनेस पॉवर

  • रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटनची नावाजलेली एनर्जी कंपनी बीपी एकत्र आले आहेत.
  • त्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या जिओ-बीपीने भारतातील पहिले आणि सर्वात मोठे ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म ब्लूस्मार्टसह भागीदारीची घोषणा केली आहे.
  • या भागीदारीमुळे, देशभरात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक ईव्ही चार्जिंग स्टेशन नेटवर्क स्थापित केले जाणार आहेत.
  • जियो-बीपी देशभरातील प्रवासी इलेक्ट्रिक वाहने आणि ताफ्यांसाठी ही स्थानके उभारणार आहेत.

जियो-बीपी नेमकं काय करणार?

  • या भागीदारीद्वारे, दोन्ही कंपन्या ब्लूस्मार्टचे ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व निर्माण आहे, त्या सर्व शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासावर एकत्र काम करण्यात येईल.
  • पहिला टप्पा दिल्ली परिसरात राबवला जाईल, जिथे प्रत्येक स्टेशनवर एका वेळी ३० वाहने चार्ज करण्याची क्षमता असेल.
  • भारतातील प्रमुख शहरांमध्ये नेटवर्क वाढवण्यासाठी ब्लूस्मार्ट दिल्ली-एनसीआरच्या सर्व-इलेक्ट्रिक फ्लीटसह मोबिलिटी क्षेत्रात हालचाल करत आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा ताफा चालवणाऱ्या ब्लूस्मार्टने भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ब्लूस्मार्ट उभारणार जगातील सर्वात मोठे ईव्ही सुपरहब

  • ब्लूस्मार्ट मोठे ईव्ही चार्जिंग सुपरहब्स चालवते.
  • जियो-बीपी भागीदारीत भारतात जागतिक दर्जाचे ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारतील.
  • ईव्ही सुपरहब्स हे ईव्ही चार्जिंगचे भविष्य आहे.
  • यामुळेच जगातील सर्वात मोठे ईव्ही सुपरहब तयार करण्यासाठी जियो-बीपी सोबत काम करण्याची योजना आहे.

Tags: JIO-BPmukeshrelianceइंधन उद्योगई-चार्जिंगजियो-बीपी
Previous Post

नव्या रुग्णांचा आकडा घटला, २४ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!

Next Post

मधमाश्यांच्या पोळ्याच्या रचनेवर आधारित ध्वनी नियंत्रण शीट अब्सॉर्बरची निर्मिती

Next Post
bee

मधमाश्यांच्या पोळ्याच्या रचनेवर आधारित ध्वनी नियंत्रण शीट अब्सॉर्बरची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!