Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू शेट्टींनी ‘खासगी’ घोटाळा उघड करण्याचा शॉक देताच सरकार वठणीवर, शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti And Nitin raut

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडित केला जाणार नसल्याची मोठी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली आहे. वीजतोडणी केलेल्या शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करणार असल्याचेही उर्जामंत्री यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला २५ ते ३० हजार कोटींचा घोटाळा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर नितीन राऊतांनी ही घोषणा केली आहे.

 

काय म्हणाले नितीन राऊत?

  • शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी हे उद्दिष्ट समोर ठेवून आमच्या सरकारने मी मा. मुख्यमंत्री आणि उषमुंख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सांगू इच्छितो की, वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी शेतकऱ्यांची जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय याठिकाणी घेण्यात येत आहे.
  • तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने वीज तोडणी आम्ही याठिकाणी तात्पुरता थांबवण्यात निर्णय घेतला आहे.

 

जवळपास २० ते २५ हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढू…

  • मध्यरात्री आणि दुपारी ज्या काळात कुणी वीज घेत नसतं त्यावेळी ओपन मार्केटमधून वीज घ्यायची आणि शेतकऱ्यांच्या माथी मारायची.
  • शेतकऱ्यांच्या वीजेचा एका युनिटचा खर्च ३ रुपयाच्यावर जातो. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरानं वीज देतो असं सांगितलं जातं.
  • म्हणजे १ रुपये ६८ पैशानं वीज घेता.
  • शेतकऱ्यांना ३ रुपयांना वीज देता.
  • आणि त्याचा अधिभार उद्योगांवर टाकता हा ढोंगीपणा आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
  • खासगी जलविद्युत प्रकल्पात तयार झालेली वीज २१ रुपये यूनिटनं खरेदी करायची.
  • हा जवळपास २० ते २५ हजार कोटींचा घोटाळा जर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही तर बाहेर काढू.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मानले ऊर्जामंत्र्यांचे आभार, दिवसा वीज पुरवठ्यावरही विचार!

  • शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांवर गेले काही दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे.
  • शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली.
  • शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणीला राज्य सरकारने स्थगिती दिल्याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे आभार मानले आहेत. येथेच न थांबता दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णय त्विरत घेण्याची मागणीही यावेळी राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
  • शेतकरी संघटनेच्या दिवसा वीज पुरवठा प्रस्तावावर तज्ज्ञांची समिती गठित केली असून अहवाल आल्यावर निर्णय घेऊ.
  • असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी राजू शेट्टी यांना दिले.

Tags: Dr. Nitin RautfarmersRaju shettiSwabhimani shetkari sanghtanaऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतराजू शेट्टीशेतकरीस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

“आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये यांच्या अंतर्भावाची गरज”

Next Post

विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक

Next Post
Pravin Darekar And devendra fadnavis

विप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीस आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!