Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये यांच्या अंतर्भावाची गरज”

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन

March 15, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Varsha gaikwad

Varsha gaikwad


 

मुक्तपीठ टीम

राज्यातील विद्यार्थी घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक विचार प्रक्रिया विकसित करणारी एकविसाव्या शतकातील कौशल्ये आणि संविधानिक मूल्ये याचा अंतर्भाव करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले.

 

राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती’ स्थापन करण्यात आली आहे. याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे. या समितीची बैठक शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.१४ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली.

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह यांनी बैठकीमध्ये आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकासंदर्भात समिती सदस्यांसमोर सादरीकरण करून पुढील रूपरेषा विषद केली. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम तयार करताना विचारात घ्यावयाच्या विविध बाबी, कौशल्य वयाचे विकसन करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापन पद्धती, याबाबत आयोजित करावयाची प्रशिक्षणे याबाबत यावेळी सांगोपांग चर्चा झाली.

 

पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) चे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य (समन्वय) विकास गरड, ICSE बोर्ड प्रतिनिधी संगीता भाटिया, IB बोर्ड प्रतिनिधी महेश बालाकृष्णन, आरपीजी फाऊंडेशनच्या संचालक राधा गोयंका, अंजुमन- ई- इस्लाम चे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, फादर जॉर्ज अथाएड, केंब्रिजचे प्रतिनिधी शमीम चौधरी, स्कूल लीडरशिप नेटवर्क मुंबई चे संस्थापक फ्रान्सिस जोसेफ यांच्यासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंब्रिज आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, विविध शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी आदी समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.


Tags: Academic curriculumeducational policyMaharashtra govtState Council for Educational Revision and Trainingvarsha gaikwadमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदवर्षा गायकवाडशैक्षणिक अभ्यासक्रमशैक्षणिक धोरण
Previous Post

पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

Next Post

राजू शेट्टींनी ‘खासगी’ घोटाळा उघड करण्याचा शॉक देताच सरकार वठणीवर, शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणार!

Next Post
Raju Shetti And Nitin raut

राजू शेट्टींनी 'खासगी' घोटाळा उघड करण्याचा शॉक देताच सरकार वठणीवर, शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!