Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारं ही अहंकारी असतात, स्वत:ला सर्वज्ञानी मानतात, त्यामुळे सल्ला घेत नाहीत!”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सडेतोड भाष्य कुणाला सुनावणारं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकार आणि नोकरशाहीवर सडेतोड भाष्य केले आहे. गडकरी म्हणाले की, “सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अहंकार आहे. त्यांना वाटतं की, सर्व माहिती माझ्याकडे आहे, म्हणून ते लोकांचा सल्ला घेत नाहीत. चांगल्या माणसांनी नेहमीच निंदा करणाऱ्या व्यक्तीला सोबत ठेवावे.” असे ते म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक सल्लामसलत अॅप ‘कन्सल्ट’ च्या लॉन्चिंगच्या वेळी गडकरींनी या गोष्टी सुनावल्या. त्यांनी हे नेमकं सरकारं म्हणत नेमकं कुणा-कुणाला सुनावलं, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

वेळेवर निर्णय न घेतल्याने प्रकल्पाला विलंब

  • गडकरी पुढे म्हणाले की, वेळेवर निर्णय न घेतल्याने सरकारी प्रकल्पांना विलंब होतो.
  • ते म्हणाले की, समस्या ही नाही की निर्णय घेतात, समस्या ही आहे की ते निर्णय घेत नाहीत.
  • येथे सहसचिवांची चूक सचिव हाताळतात, सचिवाची चूक मंत्री हाताळतात. पण मी जबाबदारी निश्चित करण्यावर विश्वास ठेवतो.

 

जास्त मोबदल्यामुळे आंदोलने नाहीत!

  • सर्व राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गांचे प्रकल्प सुरू आहेत.
  • जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर कुठेही आंदोलने होत नाहीत.
  • आता जमीन अधिग्रहणासाठी जास्त पैसे दिले जातात.
  • यामुळे लोक आता माझी जमीन घेऊ नका म्हणायला येत नाहीत.
  • माझीही जमीन घ्या असं म्हणायला आता लोक येतात.

 

कन्सल्ट अॅपविषयीची महत्त्वाची माहिती

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कन्सल्ट अॅप लाँच केले.
    या अॅपची निर्मीती माजी आयएएस अधिकारी राघव चंद्र यांनी केले आहे.
  • देशातील ६५ विभागातील ३८० तज्ञ या अॅपशी जोडलेले आहेत.
  • नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
  • आगामी काळात नीती आयोगही या अॅपची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अॅपवर प्रत्येक समस्येशी संबंधित तज्ञ सापडतील.
  • अॅपच्या माध्यमातून आरोग्य, सुरक्षा, कृषी, पर्यावरण, परराष्ट्र व्यवहार, काश्मीर प्रकरण, रेल्वे, आर्थिक, महिला सक्षमीकरण, धर्म आणि अध्यात्म यासह ६५ विषयांवरील तज्ज्ञांकडून थेट माहिती घेतली जाऊ शकते.
  • अॅपवर बोलल्यावर पहिला १ मिनिट विनामूल्य असेल आणि त्यानंतर काही शुल्क भरावे लागेल जे तज्ञांच्या खात्यात जाईल.

Tags: Consult appgovernments arrogancemuktpeethNitin Gadkariकन्सल्ट अॅपकेंद्रीय मंत्री नितीन गडकरीनितीन गडकरीमुक्तपीठसरकार
Previous Post

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित होणार!

Next Post

एसडीपीओकडून दानापूर प्रकरण दाबण्याचे कारस्थान-जयदीप कवाडे

Next Post
jaydeep kavadi

एसडीपीओकडून दानापूर प्रकरण दाबण्याचे कारस्थान-जयदीप कवाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!