Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित होणार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Parambir Singh

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच त्यांना अधिकृत फरार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. गृह विभागाने परमबीर यांना शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोचीही मदत मागितली आहे. असं मिळालेल्या माहितीद्वारे स्पष्ट झाले आहे.

 

विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परमबीर या वर्षी मे महिन्यात बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली होती. यासोबतच मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणीही त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग अँटिलिया प्रकरणानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप करून चर्चेत आले होते.

 

बिल्डर अग्रवालांच्या तक्रारीनंतर एसआयटी

बिल्डर राधेश्याम अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर पाच पोलीस अधिकाऱ्यांवर १५ कोटी रुपये वसूल करण्याचा गुन्हा मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतरच भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या गृहविभागाने एसआयटीची स्थापना करण्यात आली.

एसआयटीत खालील सदस्यांचा समावेश

  • नितीन गोयल (पोलीस आयुक्त)
  • एमएम मुजावर (सहाय्यक पोलीस आयुक्त)
  • प्रिणम परब (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
  • सचिन पुराणिक (पोलीस निरीक्षक)
  • विनय घोरपडे (पोलीस निरीक्षक)
  • महेंद्र पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
  • विशाल गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग, सायबर पोलीस ठाणे)

 

या प्रकरणी तपासणी घेण्यापूर्वी आरोपी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डीसीपी अकबर पठान, डीसीपी पराग मनेरे, एसीपी संजय पाटील, एसीपी श्रीकांत शिंदे, पोलीस निरीक्षक आशा कोंकरे यांचा समावेश आहे.

 

अग्रवाल यांचे आरोप गंभीर

  • परमबीर सिंह यांनी बनावट गुन्हा दाखल करत १५ कोटींची मागणी केली.
  • पैसे दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.
  • २०१६पासून पैशांची मागणी करत असल्याचे अग्रवालने सांगितले.
  • माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य पाच जणांवर आयपीसीच्या कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (बी), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • या संदर्भात बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पौर्णिमा या दोन भागीदारांना अटक करण्यात आली आहे.

Tags: AllegationsLawmuktpeethmumbaiparambir singhआरोपपरमबीर सिंगपोलीस आयुक्तमुक्तपीठमुंबई
Previous Post

नवाब मलिक आणि समीर वानखेडेंच्या वादाशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही!

Next Post

“सरकारं ही अहंकारी असतात, स्वत:ला सर्वज्ञानी मानतात, त्यामुळे सल्ला घेत नाहीत!”

Next Post
nitin gadkari

“सरकारं ही अहंकारी असतात, स्वत:ला सर्वज्ञानी मानतात, त्यामुळे सल्ला घेत नाहीत!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!