Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नयनरम्य स्वरसाज! सितार, गिटार, तबला, वीणा यासह विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतींसह रुपचं बदललं!

उद्यानात पुष्पवाटिका, योगकेंद्र, खुली व्यायामशाळा यासह मुलांसाठी खेळणी देखील !

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
musician Anil Mohile Udyan

मुक्तपीठ टीम

अंधेरी (पश्चिम) परिसरात असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान’ येथे विविध संगीत वाद्यांच्या भव्यदिव्य आकारातील आकर्षक व प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींची डागाडुजी, रंगरंगोटी करण्यासह परिरक्षणाची कामेदेखील नुकतीच पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे या उद्यानाला एक नवी झळाळी व आकर्षक रुपडे बहाल झाले आहे. या उद्यानामध्ये विविध वाद्यांच्या प्रतिकृतींसह मुलांसाठी खेळणी, खुली व्यायमशाळा, योगकेंद्र इत्यादी सुविधा आहेत. तर उद्यानातील पदपथांच्या कडेलाच असणा-या ध्वनिक्षेपकांमधून संगीत ऐकविण्याची व्यवस्थाही निर्धारित वेळी या उद्यानात करण्यात येते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांच्या नेतृत्वात व उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांच्या पुढाकाराने या उद्यानामध्ये विविधस्तरिय कामे करण्यात आली आहेत. ज्यामुळे या उद्यानास नुकतीच नवीन झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता केवळ परिसरातील नागरिकच नव्हेत, तर परदेशी पर्यटक देखील या उद्यानास भेट देत आहेत.

 musician Anil Mohile Udyan

संगीत उद्यान म्हणून विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकर्पण हे दिनांक २३ डिसेंबर, २०१६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. अंधेरी (पश्चिम) येथील चार बंगला नजीक व मॉडेल टाऊन परिसरात असणा-या ‘संगीतकार अनिल मोहिले मनोरंजन उद्यान’ याची महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः-
 musician Anil Mohile Udyan

  • हे उद्यान तब्बल १ लाख १ हजारांपेक्षा अधिक चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात बहरलेले उद्यान आहे.
  • या उद्यानात तबला, संवादिनी (हार्मोनियम), वीणा, सितार, गिटार इत्यादी विविध वाद्यांच्या प्रत्ययकारी प्रतिकृती आहेत. या प्रतिकृतींसोबत सेल्फी, छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची व विशेष करुन लहान मुलांची लगबग नेहमीच दिसून येते.
  • या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर व प्रवेशद्वारा नजीकच्या भिंतीवर देखील विविध वाद्यांच्या प्रतिकृती चितारलेल्या आहेत. यानुसार उद्यानातील भिंतींवर की-बोर्ड, मृदुंग, तबला-डग्गा व संगीत चिन्हांचा वापर करुन आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
  • या उद्यानात पुष्पवाटिका, पुष्पकुंज यासह फुले असणा-या वेलींनी सुशोभित केलेला ‘पुष्पलता मंडप’ देखील आहे. त्याचबरोबर विविध प्रजातींची झाडे, फुलझाडे आणि आकर्षक हिरवळ देखील या उद्यानामध्ये ठिकठिकाणी आहे.
  • या उद्यानातील पदपथांच्या लगत ध्वनिक्षेपक बसविण्यात आले असून, याद्वारे दररोज ठरलेल्या वेळी मंद आवाजातील संगीताचे सूर पाझरत असतात.
  • या उद्यानात खुली व्यायामशाळा, योगाकेंद्र, व्हॉलीबॉल मैदान, आसन व्यवस्था इत्यादी सोई-सुविधा आहेत. तसेच ३ ‘गझिबो’ देखील या उद्यानामध्ये आहेत.
  • ‘संगीत’ या संकल्पनेवर आधारित हे ‘थीम’ उद्यान सुप्रसिद्ध संगीतकार स्व. श्री. अनिल मोहिले यांच्या स्मृतींना समर्पित आहे. श्री. अनिल मोहिले यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपट गीतांना संगीतबद्ध केले असून अनेक चित्रपटांसाठी ‘संगीत संयोजन’ देखील केले आहे. भारतरत्न श्रीमती लतादीदी मंगेशकर यांच्यासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या विविध संगीत कार्यक्रमांचे संगीत संयोजन देखील त्यांनी केले होते. विशेष म्हणजे संगीतकार स्व. श्री. अनिल मोहिले हे याच उद्यानाच्या परिसरात दरवर्षी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत असत.
  • हे उद्यान दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत नागरिकांसाठी खुले असते.

Anil Mohile Garden


Tags: AndheriAttractive replicagood newsmuktpeethmumbaimusician Anil Mohile Udyanअनिल मोहिले उद्यानआकर्षक प्रतिकृतीचांगली बातमीमुक्तपीठमुंबई
Previous Post

राज्यात नवे रुग्ण ५ हजार ४५५! १४ हजार ६३५ रुग्ण बरे!

Next Post

भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा, मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न

Next Post
Stray Pets

भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा, मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!