Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा, मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न

जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचा पुढाकार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Stray Pets

मुक्तपीठ टीम

सामान्य जनतेमध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा तसेच प्राण्यांविषयीच्या विविध समस्या या विषयी प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई शहर जिल्हा प्राणी क्लेश समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

 

जिल्हाधिकारी श्री.निवतकर म्हणाले, मुंबई शहरातील भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात उच्च प्रतिच्या वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता मुंबई शहरातील विविध भागात शासकीय वैद्यकीय केंद्र स्थापन करण्याकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार करुन जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबई शहरातील प्राण्यांचे होणारे अपघात, पाळीव प्राणी किंवा भटक्या प्राण्यांची संख्या याविषयी माहिती घेण्याचे तसेच दवाखाना स्थापन करण्यासाठी मुंबई महानगरपालिका, राज्य शासन समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

प्राण्यांविषयी येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱी आणि पोलीस विभागासह भरारी पथक स्थापन करुन तक्रारींचे निवारण करण्यात यावे. प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या सर्व शासकीय आणि अशासकीय सदस्यांचा एक व्हॉट्‌स्अप ग्रुप तयार करुन प्राण्यांविषयी विविध माहिती, सूचना यांचे आदान-प्रदान करण्यात यावे. तसेच यासंदर्भात वेबसाईटही तयार करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी दिल्या.

 

पाळीव, भटके प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्याकरिता वातावरण तयार करण्यात यावे, याकरिता जनजागृतीपर साहित्य तयार करताना प्राणी कल्याणाविषयी असलेले कायदे तसेच प्राणी क्लेशाविरुद्ध कायदेशीर तरतुदी यांची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच जनजागृतीपर साहित्य तयार करताना प्राणी क्लेश टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.


Tags: Affordable Medical ServicesAnimal Cruelty Prevention ActCollector Rajiv NivatkarEstablishment of Government Medical Centergood newsmuktpeethmumbaiStray and Petsचांगली बातमीजिल्हाधिकारी राजीव निवतकरप्राणी क्लेश प्रतिबंधक कायदाभटके व पाळीव प्राणीमाफक दरात वैद्यकीय सेवामुक्तपीठमुंबई शासकीय वैद्यकीय केंद्र स्थापना
Previous Post

मुंबईतील संगीतकार अनिल मोहिले उद्यानास नयनरम्य स्वरसाज! सितार, गिटार, तबला, वीणा यासह विविध वाद्यांच्या आकर्षक प्रतिकृतींसह रुपचं बदललं!

Next Post

मराठवाड्यात २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या पहिल्या प्रकल्पासाठी ३७ कोटी!

Next Post
Water Resources

मराठवाड्यात २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या पहिल्या प्रकल्पासाठी ३७ कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!