Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना महामारीने शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांच्या अंमलबजावणीचे महत्व जगासमोर आणले”

डॉ नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

March 22, 2021
in सरकारी बातम्या
0
neelam Gorhe

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीमुळे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित झाले, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. जागतिक महिला आयोगच्या ६५ व्या वर्षानिमित्त स्त्री आधार केंद्रने समांतर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये कोरोना महामारी या जागतिक संकटाचे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व स्त्री- पुरुष समानता निर्माण करण्यासाठी संधीत रूपांतर कसे करता येईल याबाबत ऑनलाईन चर्चा सत्र नुकतेच आयोजित केले होते.

या चर्चासत्रात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, चांदनी जोशी, अपर्णा वाईकर, अजय झा, अपर्णा पाठक, झेलम जोशी, सूत्रसंचालक सतलज दिघे, यांनी चर्चासत्रात भाग घेतला होता.

उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी चर्चासत्राची सुरुवात करताना विधान परिषदच्या उपसभापती म्हणून काम करताना आलेले विविध अनुभव सांगितले. यामध्ये विविध देशात अडकून पडलेले विद्यार्थी, पर्यटक यांना भारतात आणताना केलेल्या विविध स्तरावरील प्रयत्नाबाबत त्यांन सविस्तर विवेचन केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भारतातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या व्यक्ती यांना आपापल्या गावी चालत अथवा वाहनाने किंवा रेल्वेने परत सोडत असताना शासनाने केलेली मदत व सामाजिक संस्थांचे योगदान यामुळे अचानक निर्माण झालेल्या आपत्तीमध्ये सर्व यंत्रणांचा कस लागला. या कालावधीत अनेक समस्यांना समोरे जावे लागले. विशेषतः महिला वर्गाचे काम व त्रास तिप्पटीपेक्षा जास्त झाला. महिलांना घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. मानसिक दडपण व भिती निर्माण झाली. घरकामगारांपैकी जवळपास ८५% लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी हे ४०/५० दिवस घरी जाऊ शकले नाहीत. उपसभापती कार्यालयाने स्थानिक स्तरावर रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, रुग्णांची चाचणी करणे व त्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविणे, औषधे उपलब्ध करून देणे, रुग्णाना नातेवाईकांना धीर देणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.

या कालावधीत जे आपापल्या गावी गेले त्यांच्यासाठी गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी विभागाची बैठक घेऊन चालना देण्यात आली. त्यामुळे जवळपास २० लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला.त्यामध्ये ८ लाख महिला एकल कुटुंब प्रमुख होत्या . या महामारीमुळे नवीन मित्र म्हणून मास्क, सॅनिटीझर, आँक्सीमीटर, हातमोजे, लस मिळाले. स्थानिक विकास निधीमधून ३ रुग्णवाहिका (प्रत्येकी १२ लाख),२५ लाख पीपीई किट साठी ७२लाख निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये आपली संसाधने योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे वापरावी व आपल्या कुटुंबाची,अन्नाची किंमत समजली असे प्रतिपादनही त्यांनी केले.

काठमांडू, नेपाळ येथून चांदनी जोशी म्हणाल्या, सर्व समाजात भीतीचे वातावरण होते व जग आता संपेल अशी धारणा होती. महिलांना घरगुती हिंसाचारतला व असमानतेला सामोरे जायला लागले .महिलांसाठी ही महामारी एक संयमाची परीक्षा घेणारी ठरली. त्यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दीष्ठांचे महत्व खूप अधोरेखित झाले. डिजिटल ऐक्याची आवश्यकता व सर्वानी एकत्र येऊन समानता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे यावर जोशी यांनी भर दिला. शाश्वत विकास उद्दिष्ट्ये ही सर्व मान्य उद्दिष्ट्ये असून ती सर्वांच्या प्रयत्नाने साध्य होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

अजय झा म्हणाले, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये काम अत्यंत कमी झाले आहे. त्याची गरज महामारीमध्ये स्पष्ट जाणवली. महिलांच्या आर्थिक जीवनावर मोठा परिणाम झाला ते म्हणाले. वातावरणातील बदल हा मोठा प्रश्न असून यावर काम करणे आवश्यक आहे. तसेच समानता आणण्यासाठी नियोजन करावे लागेल असेही त्यांनी अधोरेखित केले.

शांघाय (चीन) येथून अपर्णा वाईकर म्हणाल्या, कोरोना महामारी चीन मधून सुरू झाली. पण त्याचे वाईट परिणामही तात्काळ दिसायला लागले. त्यांनी महिलांच्या मानसिक परिस्थितीमधील बदल, कामात झालेली प्रचंड वाढ, शैक्षणिक प्रश्न यामुळे महिलांना आलेली निराशा याबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक समुपदेशन गट करून, WA द्वारे, टेलिफोनद्वारे गट करून, व्हीडिओ व टेलिफोन कॉन्फरन्सद्वारे महिलांना समुपदेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.

स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी संस्थेमार्फत महिलांना या कालावधीत त्यांना असलेला कायद्याचा आधार, वैद्यकीय मदत, समुपदेशनबाबत सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तरुण पिढीचा सहभाग वाढविणे, डिजिटल प्लॅटफॉर्मचा चांगला वापर करून समानता व शाश्वत विकासाच्या उद्दीष्ठांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही स्तरावर सहकार्यं हवे आहे असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समारोप प्रसंगी सांगितले.

यावेळी स्त्री आधार केंद्राच्या संस्थापिका सदस्य झेलम जोशी, मुक्ता करंदीकर, डॉ. अहंकारी सहभागी झाले होते. मुक्ता करंदीकर यांनी सर्व सहभागी मान्यवरांचे आभार मानले.

 


Tags: Dr.Neelam Gorheउप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Previous Post

“पंचमहाभुतांना कवेत घेण्याची ताकद अशोक बागवेंमध्ये!”

Next Post

“शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा!”

Next Post
nana patole 2

"शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!