Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुकानांमधील सेल्समन कायम उभे का? सेल्समननाही बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायदा येणार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
standing salesman

मुक्तपीठ टीम

तुम्ही कोणत्याही दुकानात कधीही गेलात तर दुकानात गल्ल्यावर मालक किंवा कॅशियर बसलेले दिसतील, पण इतर सेल्समन मात्र मुख्यत्वे उभेच असलेले दिसतात. कित्येक तास असे उभे राहणे सेल्समनच्या आरोग्यासाठी चांगले नसते. याचीच संवेदनशीलतेने नोंद घेत केरळनंतर तामीळनाडू राज्यानं सेल्समनना बसण्याचा अधिकार देण्यासाठी एका कायद्याचा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सेल्समनच्या बसण्याच्या अधिकारावर चर्चा सुरु झाली आहे.

केरळने केली सुरुवात! आता तामीळमाडू!! महाराष्ट्रात कधी?

  • सुमारे तीन वर्षांपूर्वी केरळने दुकानातील कामगारांना बसण्याचा अधिकार देण्यासाठी कायद्यात सुधारणा केली.
  • पण केवळ दुकानात काम करणारा सेल्समनच नाही तर इतरही अनेक अशा नोकऱ्या आहेत ज्यात तासन् तास उभे राहावे लागते.
  • मोठा मॅाल, शोरूममध्ये सेल्समनला बसण्यासाठी व्यवस्था केली जात नाही.
  • “राइट टू सिट” हा कायदा सेल्समनला बसण्याचा हक्क पुरवेल.
  • सतत उभे राहण्याणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

राइट टू सिट – बसण्याचा अधिकार आवश्यक!

  • तामिळनाडू सरकारचा हा कायदा आमलात आणण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यक्तीच्या आरोग्याची काळजी आहे.
  • कायद्यात कुठेच असे लिहलेले नाही की दुकानातील प्रत्येक कर्मचारी पूर्ण वेळ बसून काम करेल.
  • राइट टू सिट सांगतो की प्रत्येक दुकानात कर्मचाऱ्यासाठी बसण्याची व्यवस्था असावी जेणेकरून काम करताना मोकळा वेळ मिळताच ते बसू शकतील.
  • संविधानाच्या अनुच्छेद ४२ मध्ये असे म्हटले आहे की राज्ये कामाच्या योग्य मानवी परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी करतील.
  • २१ मध्ये प्रदान केलेल्या जगण्याच्या अधिकारामध्ये सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
  • केंद्र सरकारने राइट टू सिटचा कायदा केल्यास देशातील सर्व राज्यांना तसे करण्यासाठी एक मॉडेल कायदा मिळेल.

सशस्त्र दलांमध्ये असते दोन तास उभे राहण्याचे काम

  • सतत उभे राहण्याचे काम सशस्त्र दलांमध्येही असते.
  • हाती शस्त्र घेऊन सतत उभे राहणे सोपे नसते.
  • मात्र, त्या दलांमध्ये अशी ड्युटी असलेल्यांना दर दोन तासांनी त्या कामावरून हटवले जाते, तेथे दुसरा जवान येतो.
  • दुकानांमध्ये तशी काहीही सोय नसते

Tags: KeralaMaharashtraright to sitsalesmantamilnaduकेरळतामीळनाडूमहाराष्ट्रराइट टू सिटसेल्समन
Previous Post

निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने रवी राणा यांच्या अडचणीत वाढ…

Next Post

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हा! मराठी एकीकरण समितीचा दणका!!

Next Post
marathi

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हा! मराठी एकीकरण समितीचा दणका!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!