मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते किरीट सोमय्या सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे उघड करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अस्वस्थ असणारे राष्ट्रवादीतील नेते आता भाजपाविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यामागोमाग आता राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपा आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो. तसेच भाजपचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मला १०० कोटींची ऑफर दिली, असा गौप्यस्फोटही त्यांनी पुन्हा एकदा केला.
शेतकरी मेळाव्यात शशिकांत शिंदे आक्रमक!
- साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत.
- आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही.
- मागे इकडे किरीट सोमय्या आले होते.
- मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं.
ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही
- साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते.
- आपण परिणामांची चिंता करत नाही.
- ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही.
- सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.
मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही!
- भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे.
- मला मागे १०० कोटींची ऑफर दिली होती.
- भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती.
- भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या.
- त्यामध्ये माझाही समावेश होता.
- कधी कधी वाटतं ते १०० कोटी घ्यायला पाहिजे होते.
- पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
- मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही.