Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू शेट्टींना आघाडीत जाण्याचा पश्चाताप, स्वाभिमानी लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
राजू शेट्टींना आघाडीत जाण्याचा पश्चाताप, स्वाभिमानी लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार!

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय, असं खळबळजनक वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेट्टींच्या या वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले.

 

महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होतोय

  • महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय.
  • ऊस उत्पादक शेतकरी लांब गेले तर राष्ट्रवादीचं काय होईल याचा विचार करा.
  • महाविकास आघाडीनं घरगुती वीज ग्राहकांना फसवलं, पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं.
  • सरकारमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल.
  • त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, याचा निर्णय लवकरच घेऊ.
  • आता कुणाला भेटायला जायची गरज नाही.

 

तर तो कारखाना आम्ही बंद पाडू

  • किरीट सोमय्या करत असलेले आरोप आणि तक्रार मी सहा वर्षांपूर्वीच ईडीकडे केली होती.
  • मात्र, त्यावेळी ईडी येडी झाली होती.
  • आता शहाणी झाली.
  • याचा केंद्राला फायदा होईल हे आता ईडीला कळलं आहे.
  • आता सुरु असलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करु, पण हे सगळे कारखाने शेतकऱ्यांच्या ताब्यात जातील हे जाहीर करा.
  • गेल्या हंगामाची एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका.
  • दिला तर तो कारखाना आम्ही बंद पाडू.

 

 ११ टक्के महागाई भत्ता दिला

  • गेली १९ वर्षे याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला.
  • पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती.
  • आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपण आणलं.
  • पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं.
  • यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं.
  • मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही.
  • सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलंच असेल.
  • मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं संकट आलं.
  • पैसे नाही म्हणालात आणि ११ टक्के महागाई भत्ता दिला.
  • यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका
  • दसरा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करु असं मी सांगितलं होतं.
  • आता दिवाळीला गावात येणाऱ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा.
  • यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे.
  • शरद पवारांना फक्त पावसातील भाषणाची आठवण करुन देतो.
  • साखरेला चांगले भाव आले असताना एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे.

Tags: Raju shettisharad pawarswabhimani shetkari sanghatanaमहाविकास आघाडी सरकारराजू शेट्टीशरद पवारस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो! – शशिकांत शिंदे

Next Post

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! कसा आणि कुठे तपासणार?

Next Post
girl on laptop

दहावी बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर! कसा आणि कुठे तपासणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!