Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे महापालिकेवर भाजप-रिपाइंचाच झेंडा फडकेल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
पुणे महापालिकेवर भाजप-रिपाइंचाच झेंडा फडकेल

मुक्तपीठ टीम 

“रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (आठवले) कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. पण निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यात आपण कमी पडतो. आगामी निवडणुकांत रिपाइंला चांगले यश मिळवायचे असेल तर सर्व जाती-धर्मातील लोकांना सहभागी करून पक्षाला मजबूत करा,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

bhavdan 3

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पुणे जिल्हातर्फे पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार व कोरोनायोद्ध्यांचा सन्मान आणि उमेश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. बावधन बुद्रुक येथील माता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या या सोहळ्यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, ऍड. मंदार जोशी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, माहिपाल वाघमारे, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Bavadhan 1

रामदास आठवले म्हणाले, “बौद्धांच्या ताकदीर आपला पक्ष उभा आहे. पण अंतर्गत हेवेदावे आणि इतर समाजाचा पाठिंबा नसल्याने आपल्याला स्वतंत्र निवडणुका जिंकण्यात अपयश येते. सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत केला, तर आपण निवडणूक जिंकू शकतो. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती असून, पुणे महानगरपालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता येईल. मागासवर्गाचे आरक्षण पडले, तर पुण्यात आपल्या पक्षाचा महापौर होईल. तसा शब्द भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे.”

 

उमेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी बावधन भागात रिपाइं विस्तारत असून, येत्या निवडणुकीत या भागातून पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सूर्यकांत वाघमारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.


Tags: Deputy Mayor of Punyanagari Sunita Wadekardevendra fadanvispune Municipal CorporationRamdas Athavalerepublican party of indiaदेवेंद्र फडणवीसपुणे महानगरपालिकापुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकररामदास आठवलेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये
Previous Post

दुपारी एक वाजता इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल!

Next Post

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो! – शशिकांत शिंदे

Next Post
kirit somiya

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो! - शशिकांत शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!