Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप: “ड्रग्सच्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आहेत का? ड्रग पेडलरशी घनिष्ठ संबंध!”

November 1, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
malik vs fadanvis

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आजवरच्या आरोपसत्रातील सर्वात मोठा आणि गंभीर आरोप सोमवारी केला आहे. एकप्रकारे त्यांनी दिवाळीपूर्वीच मोठा स्फोट घडवला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची काही छायाचित्र सादर करत त्यांचे ड्रग माफियांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला. तसेच फडणवीसांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचा सनसनाटी आरोपही केला.

 

मलिकांचा आधी ट्वीट बॉम्ब…नंतर कॅमेऱ्यांसमोर आणखी सनसनाटी!

  • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, नंतर देवेंद्र फडणवीस यांची ड्रग माफियासोबतची छायाचित्रं मलिक यांनी ट्वीट केली.
  • त्यातील एक छायाचित्र राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट करत भाजपचं ड्रग्ज नेक्सस असा उल्लेख केला आहे.
  • याच फोटोचा आधार घेत मलिक यांनी आधी ट्विटरवर नंतर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले.
  • अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत दिसणारा ‘जयदीप राणा’ हा ड्रग पेडलर असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
  • गणपतीच्या दर्शनासाठी देवेंद्प फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचाही फोटो त्यांनी सादर केला आहे.

 

चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021

नेमकं काय म्हणाले मलिक ?

  • मी फोटो आज ट्विट केला तो ड्रग पेडलर जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे.
  • जयदीप राणा २०२० दिल्लीच्या एका अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात सध्या तुरुंगात आहे.
  • ड्रग्स ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे.
  • त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत.
  • महाराष्ट्रात जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी व्हिडीओ साँग तयार केलं होतं.
  • त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं.
  • देवेंद्र फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता.
  • त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते.
  • देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.

 

Photograph of Jaideep Rana with Ex Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/Sxo1diTalX

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021

राज्यात सर्व ड्रग्सचा खेळ हा फडणवीसांच्या इशाऱ्यावरून

  • फडणवीसांचा एक माणूस नीरज गुंडे याच शहरात राहातो.
  • ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती.
  • पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे.
  • तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचे.
  • सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे.
  • समीर दाऊद वानखेडे जो गेल्या १४ वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
  • त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पब्लिसिटी करुन निर्दोष लोकांना फसवावं.
  • ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं.
  • ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं.
  • राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.
  • ड्रग्जच्या खेळाचा मास्टर माईंड राज्याचे माजी मुख्यमंत्री तर नाही हा प्रश्न आमच्या डोक्यात येत आहे.

 

हे ही वाचा: देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यारोप: “नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! यंत्रणांसह शरद पवारांनाही पुरावे देणार!”


Tags: amruta fadanvisdevendra fadanvisJaideep RanaNawab Malikअमृता फडणवीसजयदीप राणादेवेंद्र फडणवीसनवाब मलिक
Previous Post

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार

Next Post

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे

Next Post
रविंद्र  गावडे

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!