Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यारोप: “नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! यंत्रणांसह शरद पवारांनाही पुरावे देणार!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadanvis reply malik

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची काही छायाचित्र सादर करत त्यांचे ड्रग माफियांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला. तसेच ड्रगचा मास्टर फडणवीसांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचा सनसनाटी आरोपही केला. त्यांच्या या आरोपांनंतर अपेक्षेप्रमाणेच फडणवीस यांनी त्यांना प्रत्यारोप करत उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, त्याबाबतचे पुरावे मी माध्यमांसमोर सादर करणारच आहे. पण संबंधित यंत्रणांबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे.

 

मलिकांच्या सनसनाटीवर फडणवीसांचे खळबळजनक कडक प्रत्यारोप

  • नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, त्याबाबतचे पुरावे मी माध्यमांसमोर सादर करणारच आहे.
  • पण संबंधित यंत्रणांबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे.
  • नवाब मलिकांनी फक्त लवंगी फटाका फोडला आहे.
  • दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बाँम्बच फोडणार आहे.

 

‘नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात’

  • नीरज गुंडेंशी माझे संबंध आहेत, ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही.
  • पण नीरज गुंडे हे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत.
  • मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. पण यापूर्वी उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत.
  • एवढेच नव्हे तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील.

 

फडणवीस पुराव्याशिवाय आरोप करत नाही

  • नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असणारे संबंध मी पुराव्यानिशी समोर आणेन. देवेंद्र फडणवीस हा पुराव्याशिवाय आरोप करत नाही.
  • आजपर्यंत एकदा केलेला आरोप मला कधीही मागे घेण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नवाब मलिकांनी सुरु केलेल्या या खेळाचा शेवट आता मी करणार.
  • मी काचेच्या घरात राहत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

नवाब मलिकांचे नेमके काय आरोप?

  • मी फोटो आज ट्विट केला तो ड्रग पेडलर जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे.
  • जयदीप राणा २०२० दिल्लीच्या एका अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात सध्या तुरुंगात आहे.
  • ड्रग्स ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे.
  • त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत.
  • महाराष्ट्रात जेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक नदी स्वच्छता मोहीमेविषयी व्हिडीओ साँग तयार केलं होतं.
  • त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं.
  • देवेंद्र फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता.
  • त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते.
  • देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.’

 

हे ही वाचा: नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप: “ड्रग्सच्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आहेत का? ड्रग पेडलरशी घनिष्ठ संबंध!”


Tags: amruta fadanviscm uddhav thackeraydevendra fadanvisNawab MalikNiraj Gundesharad pawarअमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकनीरज गुंडेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशरद पवार
Previous Post

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे

Next Post

‘दूध – साखरेसारखी गोडी’पासून देशाच्या नेतृत्वापर्यंत! नगरच्या दंडकारण्य अभियानात ठाकरे-कदम-थोरांतांनी उधळले शब्दसुमन!

Next Post
balasaheb thorat

'दूध - साखरेसारखी गोडी'पासून देशाच्या नेतृत्वापर्यंत! नगरच्या दंडकारण्य अभियानात ठाकरे-कदम-थोरांतांनी उधळले शब्दसुमन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!