Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार अमोल कोल्हे एकांतवासाच्या भूमिकेत! चालले विपश्यनेला, पण फेबू पोस्टमुळे चर्चा!

"घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचाराची गरज!" खासदार अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
amol kolhe fb post

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खरंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते विपश्यनेसाठी चालले आहेत. एकांतवासाचा भलता अर्थ काढला जाऊ नये. पण त्यांनी काही निर्णयाचा फेरविचार आणि विचार करण्याची गरज असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख केल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहे.

 

पोस्टमध्ये काय म्हणाले अमोल कोल्हे?

  • ‘सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो.
  • काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलं उचलली.
  • पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय.
  • थोडा शारीरिक, बराचसा मानसिक थकवा आलाय.
  • शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल; पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं-थोडं मनन, थोडं चिंतन!
  • घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचारसुद्धा!
  • त्यासाठीच एकांतवासात जातोय.
  • काही काळ संपर्क होणार नाही!
  • पुन्हा लवकरच भेटू…नव्या जोमाने, नव्या जोशाने!
  • टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही.

खासदार अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये गेल्या काही वर्षात घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चेला उत आला आहे. “पण त्याच पोस्टमध्ये त्यांनी एक खास टीप जोडली आहे. फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही.” त्यातून वेगळा काही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे त्यांनी सुचवल्याचे मानले जाते.


Tags: amol kolheNCPअमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

समीर वानखेडेंमुळे आता क्रांती रेडकरच्या बहिणीचा भूतकाळ चर्चेत

Next Post

होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना ‘नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार २०२१’ प्रदान

Next Post
Dr Nikam 1

होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम यांना 'नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार २०२१' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!