मुक्तपीठ टीम
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकार काळातील कारभारावर टिपण्णी केली आहे. ‘मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी “ठप्प” झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात निर्णय घेतले जात नव्हते. मात्र त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्णन असामान्य व्यक्ती असे केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – अहमदाबाद (IIM-A) येथे तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नारायण मूर्ती यांनी हे म्हटले आहे.
यूपीएच्या काळात भारताची प्रगती ठप्प होती!!
- एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण मूर्ती म्हणाले की, ‘मी लंडनमध्ये (२००८ ते २०२१ दरम्यान) एचएसबीसीच्या बोर्डावर होतो.
- पहिल्या काही वर्षांत, जेव्हा बोर्डरुममध्ये (बैठकांमध्ये) चीनचा दोन-तीन वेळा उल्लेख केला जायचा, तेव्हा भारताचे नाव एकदाच येत असे.
- मूर्ती पुढे म्हणाले, काय झाले? मनमोहन सिंग हे एक असामान्य व्यक्ती आहेत. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.
- परंतु यूपीएच्या काळात भारताची प्रगती ठप्प झाली होती.
- निर्णय घेतले जात नव्हते.
जगात भारताविषयी आदराची भावाना:
- २०१२ साली एचएसबीसी सोडताना भारताचा क्वचितच उल्लेख व्हायचा, त्यावेळी चीनचे नाव जवळपास ३० वेळा बैठकांमध्ये घेतले जायचे.
- आज जगभरात भारताविषयी आदराची भावना आहे.
- आणि देश आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.