Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अदानी-अंबानी यांच्यातील ‘नो-पोचिंग’ करार म्हणजे नेमकं काय? कसा होणार दोन्ही समुहांच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Adani and ambani

मुक्तपीठ टीम

आशियातील सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी ‘नो-पोचिंग’ करार केला आहे. याअंतर्गत रिलायन्स समूह आणि अदानी समूहाच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या समूह कंपन्यांमध्ये काम करता येणार नाही. याद्वारे दोन्ही समूह कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांच्या कंपन्यात काम करण्यापासून रोखता येईल. हा करार या वर्षी मे महिन्यापासून लागू झाला असून दोन्ही कंपन्यांशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी आहे.

यावेळी केला करार…

  • हा करार यावर्षी मे महिन्यात आणण्यात आला असून तो या दोन समूहाच्या सर्व व्यवसायांना लागू होईल.
  • दोन्ही समूहांमधील स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे.
  • कारण अदानी समूहाचा व्यवसाय झपाट्याने वाढत असताना रिलायन्स समूहाचे आधीच मोठे नाव आहे, अशा व्यवसायांमध्ये आता अदानी समूह हळूहळू पाय रोवत आहे.
  • याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी ‘अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ सोबत अदानी समूहाने पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात प्रवेश केला, ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आधीच वर्षानुवर्षे देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून कार्यरत आहे.

टेलिकॉम क्षेत्रातही दोन्ही समूहात स्पर्धा:

  • पेट्रोकेमिकल्सशिवाय अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी पहिले पाऊल टाकले आहे.
  • 5G स्पेक्ट्रमवरून दोन अब्जाधीश कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
  • अदानीने हाय-स्पीड डेटा क्षेत्रात 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे.
  • तर या व्यवसायातही रिलायन्स आधीच अग्रसेर आहे.

किती कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?

  • मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील करारामुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी आता मार्ग बंद झाला आहे.
  • मुकेश अंबानींच्या कंपन्यांमध्ये ३ लाख ८० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत, तर अदानींच्या कंपन्यांमध्ये २३ हजार कर्मचारी काम करत आहेत.
  • मे महिन्यापासून लागू झालेल्या या करारानंतर आता या दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी एकमेकांसोबत काम करू शकणार नाहीत.

Tags: 'नो-पोचिंग' करारadani groupEmplyoeegautam adanimukesh ambaniReliance Groupअदानी समूहकर्मचारीगौतम अदानीमुकेश अंबानीरिलायन्स इंडस्ट्रीज
Previous Post

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Next Post

मनमोहन सिंह असामान्य! पण त्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास ठप्प!! – नारायण मूर्ती

Next Post
Narayan Murthy And Manmohan Singh

मनमोहन सिंह असामान्य! पण त्यांच्या कार्यकाळात देशाचा विकास ठप्प!! - नारायण मूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!