मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण राणे यांना हृदयासंबंधी त्रास होऊ लागल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
नारायण राणेंवर अँजिओप्लास्टी करण्यात आलीय…
- नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते.
- यावेळी अँजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लॉक आढळले.
- यानंतर शुक्रवारी साकळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
- नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
काय आहे अँजिओप्लास्टी प्रक्रिया?
- हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास असलेल्या लोकांना डॉक्टर सामान्यतः अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देतात.
- हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो.
- तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.
- याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते.
- अँजिओप्लास्टी ही अशी एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यात हृदयाच्या मांसपेशींपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिकांमधले अडथळे दूर करून त्या मोकळ्या केल्या जातात.
- वैद्यकीय भाषेत या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज असे म्हणतात.