Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट! समीर वानखेडेंना आणखी एक धक्का!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amir Khan Sameer Wankhede

मुक्तपीठ टीम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. पण त्यात आर्यन खानचे नाव नाही. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह २० जणांना आरोपी बनवले होते. पुराव्याअभावी आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या हिरोसारखे नेहमी प्रकाशझोतात राहणाऱ्या समीर वानखेडेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या तपासकौशल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही!

ड्रग कनेक्शन प्रकरणात एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव नाही. एनसीबीचे डीडीजी (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंह यांनी सांगितले की, चौदा आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पुराव्याअभावी उर्वरित सहा जणांविरुद्ध तक्रार नोंदवली जात नाही.

ड्रग्ज प्रकरणात एकूण २० जण आरोपी

  • मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी एनसीबीने एकूण २० जणांना आरोपी केले आहे.
  • आतापर्यंत २० पैकी १८ आरोपींना जामीन मिळाला आहे.
  • ते आता तुरुंगाबाहेर आहेत, तर २ आरोपी अजूनही कारागृहात आहेत.
  • आतापर्यंत जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची नावे आहेत.

वानखेडेंवर आरोप करणाऱ्या साक्षीदाराचा मृत्यू

  • आर्यन खान ड्रग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला.
  • एनसीबीचे प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल यांचे निधन झाले. प्रभाकर सेलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • आर्यन खान ड्रग केसमध्ये तो महत्त्वाचा साक्षीदार होता.
  • मात्र, पुढे त्याने समीर वानखेडे आणि इतरांची नावे घेते ते या प्रकरणात पैसे वसूल करू पाहत होते, असा आरोप केला.

ग्लॅमर, ड्रग आणि धोका!

  • आर्यन खानला गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका क्रूझ जहाजावर छापा टाकताना एनसीबीने अटक केली होती.
  • जहाजात असलेल्या आरोपींवर प्रतिबंधित औषधे बाळगणे, सेवन करणे आणि विक्री करणे या आरोपाखाली विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
  • त्यानंतर अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला.
  • या प्रकरणातील साक्षीदाराने तपास अधिकारी संचालक समीर वानखेडेंवरच आरोप केले.
  • काही दिवसांनी प्रभाकर साईलचा ह्रदयविकाराने मृत्यू ओढवला.
  • पण आश्चर्यकारकरीत्या एका मर्यादेपलीकडे त्यावर काहीही चर्चा झाली नाही.
  • समीर वानखेडेंची काही महिन्यांपूर्वी एनसीबीतून दुसऱ्या विभागात बदली झाली.

Tags: Aryan KhanClean CheatNCBSameer Wankhedeआर्यन खानएनसीबीक्रूझ ड्रग्ज प्रकरणक्लीन चिटसमीर वानखेडे
Previous Post

दाऊद पाकिस्तानातून मुंबईतील कुटुंब कसं चालवतो?

Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर करण्यात आली ती ‘अँजिओप्लास्टी’ असते कशी?

Next Post
narayan rane

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर करण्यात आली ती 'अँजिओप्लास्टी' असते कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!