Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शेतकऱ्यांची देणी बाकी! नांदेडच्या साखर कारखान्याची विक्री झालीच कशी?”

शिवसेनेच्या शेतकरी नेत्यांचा साखर आयुक्तांना प्रश्न

February 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
sugar factory

मुक्तपीठ टीम

नांदेड जिल्ह्यातल भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने युनिट ४ला गाळप केलेल्या ऊसाचे शेतकऱ्यांचे दहा कोटी वीस लाख रुपये शिल्लक देणे बाकी आहेत. त्याची जबाबदारी निश्चित न करता शासनाला चुकीची माहिती देऊन सदर आरएसएफच्या रकमेची माहिती दडवून ठेवली आणि कारखाना विक्री परवानगी मिळवून युनिट क्रमांक चारची विक्री केली, असा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखालील मानला जातो. या साखर कारखान्याच्या एका युनिटची नुकतीच विक्री करण्यात आली. विक्री केलेल्या युनिटने २०१६-१७च्या गाळप हंगामात १६५८८५ मेट्रीक टन ऊस गाळप केले होते. भाऊराव युनिट क्र.४ मध्ये गाळप केलेल्या ऊस ऊत्पादकांचे २०१६-१७ मधिल आरएसएफ ची बाकी प्रति टन ६१५ रूपये आहे. म्हणजेच १६५८५ X ६१५ = १०२०१३१२५ असे दहा कोटी वीस लाख तेरा हजार एकशे पंचविस रूपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. कारखाना विक्री करतांना त्या पैशाची जवाबदारी कुणावर निश्‍चित केली नाही. तरीही विक्रीची परवानगी देण्यात आली. विक्रीही झाली. त्यामुळे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांचे प्रश्न:

प्रल्हाद इंगोले

  • शेतकऱ्यांचे देणे बाकी असताना सदर कारखाना विक्री करण्याची परवानगी प्रशासनाने भाऊराव कारखान्यास कशी दिली?
  • आरएसफच्या थकीत बाकीबाबत आयुक्त प्रशासनाला कल्पना नव्हती काय?
  • भाऊराव कारखान्याने आरएसफची बाकी बाबत आयुक्त कार्यालयाला अंधारात ठेवून कारखाना विक्रीची परवानगी घेतली का ? आरएसएफचे पैसे शेतकर्‍यांना कोण देणार?
  • साखर आयुक्त कार्यालय यावर काय कार्यवाही करणार?

 

 


Tags: Shivsenasugar factoryप्रल्हाद इंगोलेसाखर कारखाना
Previous Post

लोकलने प्रवास करताना काय काळजी घ्याल? वाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला…

Next Post

खरीप खरेदी जोरात,  २६ लाख २३ हजार कोटी खर्चून किमान हमी दराने कापूस खरेदी

Next Post
cotton

खरीप खरेदी जोरात,  २६ लाख २३ हजार कोटी खर्चून किमान हमी दराने कापूस खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!