Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खरीप खरेदी जोरात,  २६ लाख २३ हजार कोटी खर्चून किमान हमी दराने कापूस खरेदी

February 3, 2021
in सरकारी बातम्या
0
cotton

मुक्तपीठ टीम

 

खरीप पिकांचा २०२०-२१चा विपणन हंगाम सुरू आहे. मागील हंगामाप्रमाणेच यंदाही किमान आधारभूत मूल्यानुसार सरकारने खरीप २०२०-२१च्या हंगामामध्ये अन्नधान्य खरेदीचे व्यवहार किमान आधारभूत मूल्य देवून सुरू ठेवले आहेत.

 

खरीप विपणन हंगाम २०२०-२१मध्ये तांदळाची खरेदी निरंतर होत असून व्यवहार सुरळीत चालू आहेत. वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तांदळाची आवक होत आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ आणि गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये २९ जानेवारी २०२१ पर्यंत ५९६.९८ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळापर्यंत ५०१.९७ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला होता. यंदा तांदळाच्या खरेदीमध्ये १८.९२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकूण ५९६.९८ लाख मेट्रिक टन तांदूळ  खरेदीपैकी एकट्या पंजाबमध्ये २०२.७७ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाला आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण खरेदीपैकी ३३.९६ टक्के  आहे.

 

graft

खरीप विपणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत मूल्यानुसार पिकांची खरेदी होत असून आत्तापर्यंत ८६.७९ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. त्यांच्या धान्य खरेदीसाठी ११२७०९.८४ कोटी रुपये दिले आहेत.

 

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम-२०२० मध्ये ५१.९२ लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार (पीएसएस) करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच १.२३ लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ यांच्या मागणीनुसार करण्यात येणार आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर अन्नधान्य मागणीचे प्रस्ताव पाठविले तर ते त्वरित मान्य करण्‍यात येणार आहेत. गुजरात आणि तामिळनाडू यांच्यासाठीही २.५० लाख मेट्रिक टन डाळी, तेलबिया यांची रब्‍बी हंगाम २०२०-२१ खरेदी करण्‍यात येणार आहे. या मागणीचा प्रस्‍तावानुसार ही खरेदी करण्‍यात येणार आहे. डाळी, तेलबिया आणि  खोबरे यांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार करण्यात येणार आहे. या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकरी बांधवांकडून २०२०-२१च्या अधिसूचित किमान आधारभूत मूल्यानुसार नियोजित हंगामामध्ये करण्यात येणार आहे. तसेच तिथे जर अन्नधान्याच्या किंमती किमान आधारभूत मूल्यांपेक्षा कमी झाल्या तर राज्यांनी निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थांकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या पिकांची खरेदी करण्यात येणार आहे.

 

graft

२९ जानेवारी २०२१ पर्यंत सरकारने नोडल संस्थांच्यामार्फत ३,०३,९३९.५८  मेट्रिक टन मूग आणि उडीद, तूर, भूईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीन यांची किमान आधारभूत मूल्याने खरेदी केली. त्यासाठी १,६३२.८९ कोटी रूपये मोजले. याचा तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमधल्या १,६४,०८३ शेतकरी बांधवांना लाभ झाला.

 

त्याचप्रमाणे, २९ जानेवारी २०२१ पर्यंत ५०८९ मेट्रिक टन खोबरे खरेदी केले. यासाठी ५२.४० कोटी रूपये किमान आधारभूत मूल्यानुसार पैसे देण्यात आले. त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या ३९६१ शेतकऱ्यांना फायदा झाला. सद्यस्थितीत खोबरे आणि उडीद यांचे दर बहुतांश प्रमुख उत्पादक राज्यांमध्‍ये किमान आधार मूल्यापेक्षाही जास्त आहेत. डाळी आणि तेलबिया यांची ज्याप्रमाणात आवक सुरू आहे, त्याप्रमाणेच राज्यांनीही आवश्यक खरेदी आणि इतर व्यवस्था करण्यास प्रारंभ केला आहे.

 

graft

 

खरीप विपणन हंगाम २०२०-२१ मध्ये २९ जानेवारी २०२१ पर्यंत कापूस महामंडळाने ८९७०४२४ गाठी (गासड्या) कापसाच्या खरेदी केल्या आहेत. यासाठी किमान आधारभूत मूल्याने २,६२,३,५२८ कोटी रूपये देण्यात आले. याचा १८,४७,६६२ कापूस उत्पादकांना लाभ झाला. ही खरेदी पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातून सुरळीत  सुरू आहे.

 

graft

 


Tags: cottonCotton Corporation of Indiaकापूसखरीप पिक
Previous Post

“शेतकऱ्यांची देणी बाकी! नांदेडच्या साखर कारखान्याची विक्री झालीच कशी?”

Next Post

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा – काही नवे पायंडे…

Next Post
बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा – काही नवे पायंडे…

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा - काही नवे पायंडे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!