Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत काय सुरु, काय बंद, किती वेळ?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
unlock (2)

मुक्तपीठ टीम

राज्यात कोरोना दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने राज्यात पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात केली आहे. तिसऱ्या गटात समावेश असलेल्या मुंबईतही नेमकं कोणकोणत्या गोष्टी सुरू आणि कोणत्या बंद राहणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील ‘ अनलॉक’ची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईत आता जीम, रेस्टॉरंट्स, हॉटेल, सलून, स्पा, ब्लूटी पार्लर सुरू होणार आहेत. पण त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

 

नेमकं मुंबईत काय सुरू, काय बंद?

  • मुंबईत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ब्लूटी पार्लर, स्पा, सलून आणि जीम दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहेत.
  • दुपारी ४ नंतर या सर्व आस्थापना बंद राहतील.
  • हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला दुपारी ४ नंतर पार्सल सेवा आणि होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल.
  • यासोबतच सलून, जीम, ब्लूटी पार्लर सुरू ठेवताना एसी बंद ठेवावा लागणार आहे.
  • ज्या आस्थापनांमध्ये एसी सुरू असलेला आढळून येईल त्यांच्यावर मनपाकडून कारवाई करण्यात येईल, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे .
  • मुंबईतील थिएटर्स आणि मॉल्स अद्याप बंद राहणार असल्याचं पेडणेकरांनी स्पष्ट केलं आहे.
  • पण मुंबईत सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली आहे.
  • सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कमीत कमी उपस्थितीत करता येतील.
  • मुंबईतील खासगी कार्यालयांना आता दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • यात कार्यालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.
  • मुंबईत आता लग्न सोहळ्यासाठी वधू आणि वर दोन्ही मिळून ५० माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
  • अंत्यसंस्कारासाठी २० माणसांची उपस्थितीचा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
  • जॉगिंग ट्रॅक , गार्डन पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
  • सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
  • शहराचा पॉझिटीव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्सची संख्या पाहून योग्य वेळी लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, असे महापौर म्हणाल्या .

Tags: mumbaiunlockअनलॉककोरोनामुंबई
Previous Post

पाच वाजता पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश, लसीकरणाविषयी मोठी घोषणा?

Next Post

“महापौरांचा १००% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई”- ॲड.आशिष शेलार

Next Post
ashish shelar-kishori pednekar

"महापौरांचा १००% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई"- ॲड.आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!