Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महापौरांचा १००% नालेसफाईचा दावा फोल; ही तर हातसफाई”- ॲड.आशिष शेलार

भाजपाच्या पहाणी दणक्यानंतर महापौरांना जाग - तातडिने नाला पहाणी दौरा आयोजित

June 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar-kishori pednekar

मुक्तपीठ टीम

मुंबई शहरातील १०७ टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला होता. भाजपकडून सोमवारी शहरातील नाल्यांची पाहणी करून महापौरांचा १०७ टक्के नालेसफाई केल्याचा दावा फोल ठरवला. ही नालेसफाई नव्हे, तर हातसफाई केली आहे, अशी टीका आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली.

 

मुंबई शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट व भाजपा नगरसेवक यांनी शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा पूर्ण केला. यादरम्यान स्थानिक नागरिकांनीही नालेसफाईबाबत तक्रारी केल्या. नालेसफाईबाबत पालिका प्रशासन आणि शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. नाल्यांमध्ये कचरा असल्याने पावसाळ्यात ते तुंबून त्याचा मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांची फसवणूक करणारे प्रशासन आणि शिवसेनेला सभागृहात उत्तर देऊ असा इशारा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.

 

इतके दिवस महापौर कार्यालयात बसून नालेसफाई १०७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना भाजपाच्या नालेसफाई पाहणीनंतर जाग आली असून त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीच तात्काळ नालेसफाईसाठी दौरा आखला असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. त्याचबरोबर गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैया नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत. मुंबईच्या महापौर या नाल्यांचा दौरा करून १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करतील काय? असा प्रश्नही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.

 

मुंबईकर नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ खेळत असल्याची टीका आमदार शेलार यांनी केली. दरवर्षी नालेसफाई होतच नाही, परंतु पैसे काढले जातात. कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेकडून नालेसफाई १०७ टक्के केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना तो फोल असल्याचे आमदार ॲड.आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

 


Tags: bjp ashish shelarmumbaiनालेसफाईबृहन्मुंबई महानगरपालिकाभाजपामहापौर किशोरी पेडणेकरशिवसेनाॲड.आशिष शेलार
Previous Post

मुंबईत काय सुरु, काय बंद, किती वेळ?

Next Post

मुंबई पोलिसांची बनावट औषधांप्रकरणी मध्यप्रदेशात कारवाई, औषध कारखानदारास अटक

Next Post
arrested man

मुंबई पोलिसांची बनावट औषधांप्रकरणी मध्यप्रदेशात कारवाई, औषध कारखानदारास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!