Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडमुळे महाराष्ट्राचे १,५८० कोटी वाचणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kanjurmarg

मुक्तपीठ टीम

 

जंगलातील झाडांची कत्तल करून उभारल्या जाणाऱ्या आरे कार शेडला कांजुरमार्गला हलवल्यामुळे जनतेच्या पैशाचे वारेमाप नुकसान होईल असा अपप्रचार करणाऱ्यांना खोटे पाडणारी एक माहिती समोर आली आहे. तसे दावे करणारे सरकारी अहवालांचे दाखले देत असत, त्यांना खोटे पाडणारा माहितीही सरकारी समितीच्या अहवालातीलच आहे.

 

मुंबई मेट्रो ३ कारशेड गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेट्रो ३चा कार डेपो आरे येथे उभारायचा की कांजुरमार्गमध्ये, यावरून वाद सुरू आहे. तो संपण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारल्यास राज्याचे तब्बल १,५८० कोटी वाचतील, असा अहवाल नव्या समितीने दिला आहे.

 

कांजुरमार्गच्या कारशेडमुळे फायदा

  • मुंबई ३ मेट्रो कारशेडसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती.
  • या समितीत नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला होता.
  • कांजुरमार्ग येथील जागेत मेट्रो कारशेड बांधल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे १५८० कोटी रुपये वाचतील.
  • कांजुरमार्ग येथील जागा आरे येथील जागेपेक्षा मोठी आहे.
  • आरे कारशेडमध्ये केवळ ३० मेट्रो उभ्या राहू शकतात. याउलट, कांजुरमार्ग येथील जागेत ५५ मेट्रो उभ्या राहू शकतात.
  • २०३१ पर्यंत आरे येथील डेपोची क्षमता कमी होत जाईल आणि त्यानंतरच्या टप्प्यात गंभीर क्षमतेची कमतरता निर्माण होईल.
  • भविष्यात आरे मेट्रो डेपोच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त पाच हेक्टर जमीन लागेल. त्यासाठी पुन्हा आरे जंगलातील १,०८९ झाडे तोडण्याची आवश्यकता असेल.
  • एकदा मेट्रो सर्व मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर आरे व्यतिरिक्त अतिरिक्त डेपो सुविधा तयार करणे अवघड आहे, असे त्यात म्हटले आहे.
  • मेट्रो ३,६ आणि ४ च्या डिझाइन ट्रॅफिकसाठी एकत्रित डेपो-कम-वर्कशॉपचे नियोजन व डिझाइन करण्यासाठी कंजूरमार्ग जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि पुरेशी आहे.

 

नवी समिती कशासाठी?

  • केंद्र सरकारने जमिनीवर आपला दावा सांगितल्यामुळे कांजूरमार्ग येथे कोर्टाने बांधकाम थांबविल्यानंतर समितीची स्थापना केली गेली.
  • मुंबई उपनगरी जिल्ह्यातील जिल्हाधिका्यांनी १०० हेक्टर जमिन एमएमआरडीएकडे सोपविली होती.
  • मेट्रो ६ (जोगेश्वरी-विक्रोळी), (कुलाबा-सीप्झ) आणि (वडाळा-कासारवादावली) साठी एकात्मिक कारशेडची योजना होती.
  • मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • कारशेड प्रकरणातील ही तिसरी समिती आहे.
  • २०१५ मध्ये तत्कालीन एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदन यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या समितीची स्थापना करण्यात आली होती, ज्यांनी कांजूरमार्ग प्रकल्पाची शिफारस केली होती.
  • दुसरे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अधिपत्याखाली होती, ज्यांनी जानेवारी २०२० मध्ये सादर केलेल्या अहवालात आरे कांजूरमार्ग प्रकल्पाची शिफारस केली होती.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: KanjurmargMaharashtrametro carshedकांजुरमार्गमहाराष्ट्रमुंबई मेट्रो ३मेट्रो कारशेड
Previous Post

मुंबईतील राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्याची शक्यता

Next Post

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३६वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

Next Post
Metro 3

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३६वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!