मुक्तपीठ टीम
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. बाजारात कंदील खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये आकाशात उडवणारे म्हणजेच चायनीज फ्लाइंग कंदिल देखील मोठ्या प्रमाणात सोडले जातात. मात्र, यंदा या कंदीलांवर मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबईत कंदिल उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.
आदेशात काय म्हटलं आहे?
- मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
- आकाशात कंदिल उडवल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
- त्यामुळे मुंबईत चायनीज फ्लाइंग कंदिलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील १४ नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे.
- येत्या १६ ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदिलांचा वापर आणि विक्री ३० दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे.
- या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करणार आहेत.
चायनीज कंदिल उडविण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
- सणासुदीला मुंबईत चायनीज कंदिल उडविण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
- या कंदिलाबाबत सर्वसामान्यांना असलेल्या आकर्षणामुळेच नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या पट्ट्यात हे लँटर्न विकले जातात व तेथेच ते आकाशात सोडले जातात.
- या कंदिलाच्या तळाशी ज्वालाग्रही पदार्थ लावून ते हवेत सोडण्यात येतात.
- दिवाळीच्या दिवसांत मुंबईत हे कंदिल विक्री करण्यास व उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.