Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्कराच्या ‘झूम’ श्वानाने दहशतवाद्यांचा केला खात्मा, दोन गोळ्या लागलेल्या असतानाही दिला लढत

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
indian army zoom dog

मुक्तपीठ टीम

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक श्वान गंभीर जखमी झाला. रात्री उशिरा दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेत लष्कराने आपल्या लढाऊ सैनिक झूमलाही खाली आणले होते. झूम हे भारतीय लष्करातील श्वानाचे नाव आहे. दहशतवादी लपलेले घर खाली करण्याचे काम झूमला देण्यात आले होते. झूमने घरात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला. यावेळी ऑपरेशन दरम्यान झूमला दोन वेळा गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला.

अधिकार्‍यांनी सांगितले की झूम पूर्वीही अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग आहे. “झूमने दहशतवाद्यांवर हल्ला केला यादरम्यान त्याला दोन गोळ्या लागल्या.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या धाडसी श्वानाला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की झूमला दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले, तर दोन जवानही जखमी झाले.”

दोन गोळ्या लागल्यानंतरही ‘झूम’ लढत राहिला… लष्कराने शेअर केला व्हिडीओ!

  • लष्कराने आपल्या धाडसी झूमच्या प्रशिक्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
  • प्रशिक्षणाचा व्हिडीओ पाहून अंदाज लावू शकता की जगातील कोणताही दहशतवादी झूमपासून सुटू शकत नाही.
  • लष्कराकडे श्वानांची मोठी फौज आहे.
  • भारतीय लष्कर आपल्या सैन्यात वेगवेगळ्या जातीच्या श्वानांची देखभाल करते.
  • यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड्स, बेल्जियन मालिनॉइस आणि ग्रेट माउंटन स्विस डॉग्स यांचा समावेश आहे.
  • यांची वेगवेगळी कर्तव्ये आहेत. यामध्ये गार्ड ड्युटी, गस्त घालणे, स्फोटक द्रव्ये, स्निफिंग ड्रग्ज आणि इतर प्रतिबंधित वस्तू इत्यादींचा समावेश आहे.

या वर्षी ३० जुलै रोजी झूमच्या आधी आर्मी डॉग एक्सलनेही अशाच प्रकारे दहशतवाद्यांना लढा दिला होता. शौर्य दाखवून एक्सल शहीद झाला. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त एक्सला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.


Tags: good newsIndian Armyindian army dogindian army zoom dogmuktpeethTermination of Terrorismघडलं-बिघडलंचांगली बातमीझूम श्वानदहशतवादी खात्माभारतीय लष्करमुक्तपीठ
Previous Post

मुंबईत उडत्या आकाश कंदिलांवर बंदी! सुरक्षेला धोक्यानं निर्णय!

Next Post

अंधेरीत कोण बाजी मारणार? दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल

Next Post
Andheri by election

अंधेरीत कोण बाजी मारणार? दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!