Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! – उच्च न्यायालय

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
high court mumbai

मुक्तपीठ टीम

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला बेजबाबदार वागणारे नागरिकही जबाबदार असून अशा नागरिकांना मुंबईच्या उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र तरीही काही लोक सरकारलाच दोष देत आहेत. अशा नागरिकांनी स्वत: आधी कोरोना नियमांचे पालन करावे आणि मग सरकारला दोष द्यावा अशा शब्दात उच्च न्यायालयाने कानउघडणी केली आहे. त्याचवेळी कोरोना सुरक्षा नियम मोडणाऱ्या अशा नागरिकांना कारवाईपासून वाचवण्यासाठी राजकारणी आणि अन्य प्रभावशाली व्यक्तींनी त्यांचा प्रभाव वापरू नये, असंही न्यायालयाने सुनावले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडार यांच्या खंडपीठाने लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसह सर्वांना घराबाहेर पडताना आधार कार्ड आणि मास्क घालणे आवश्यक असल्याचे बजावले आहे.

लोकानीही संयम आणि शिस्त पाळावी

न्यायमूर्ती घुगे म्हणाले की सरकारला दोष देण्यापूर्वी आपण नागरिक म्हणून सभ्यता आणि संवेदनशीलता दाखविली पाहिजे. लोकांनी संयम राखावा व शिस्त पाळावी. सरकारी योजना व यंत्रणा चांगल्या असतात, परंतु लोकच त्याची वाट लावतात. न्यायालयाने म्हटले की, काही लोक कोरोना नियम पायदळी तुडवत विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात.

 

मास्क हनुवटीखाली घालणारे सुपर स्प्रेडर

न्यायालयाने म्हटले आहे की, घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीने किमान नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्क घालावा. न्यायमूर्ती घुगे म्हणाले, हनुवटीखाली मास्क असलेल्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण असे लोक सुपर स्प्रेडर ठरू शकतात.

 

लॉडाऊन मोडणाऱ्यांसाठी दबाव आणू नका

कोरोना नियम मोडणाऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणेवर येणाऱ्या दबाबाची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. लॉकडाउन उल्लंघन करणार्‍याला मदत करण्यासाठी कोणत्याही राजकारण्याने किंवा कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीने त्याचा प्रभाव वापरु नये, असे कोर्टाचे म्हणणे आहे.

 

सरकारी धोरणात हस्तक्षेपाचा हेतू नाही

गेल्या आठवड्यात खंडपीठाने कोरोना उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि रेमदेसिविर इंजेक्शनची कमतरता आणि कोरोना निर्बंधाचे लोकांकडून उल्लंघन यासारख्या प्रकरणांची स्वत:हून दखल घेतली होती. ऑक्सिजन आणि रेमदेसविर इंजेक्शन वितरणाच्या सरकारच्या धोरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला हेतू नव्हता असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


Tags: Corona Virusmumbai hight courtकोरोनामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

दाऊदही ज्याला घाबरतो त्या छोटा राजनला कोरोना!

Next Post

नेहा धुपियाकडे टारगटानं मागितला स्तनपानाचा व्हिडीओ…तिनं ‘असं’ सुनावलं!

Next Post
neha dhupia

नेहा धुपियाकडे टारगटानं मागितला स्तनपानाचा व्हिडीओ...तिनं 'असं' सुनावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!