Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दाऊदही ज्याला घाबरतो त्या छोटा राजनला कोरोना!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chota rajan

मुक्तपीठ टीम

कोरोनाला कमी लेखत सुरक्षा नियमांची अवहेलना करत स्वत: आणि इतरांना धोक्यात टाकणाऱ्यांना जागं करणारी बातमी आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो. ताजं उदाहरण तिहार कारागृहातील छोटा राजनचं आहे.

कुख्यात दहशतवादी माफिया डॉन दाऊद इब्राहिमही ज्याला घाबरतो त्या माफिया डॉन छोटा राजनला कोरोनाने गाठले आहे. उपचारासाठी राजनला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिहार तुरूंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली आहे.

२०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक झाल्यापासून राजनला नवी दिल्लीतील उच्च-सुरक्षा तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात मुंबईत नोंदविण्यात आलेली सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत. तसेच त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.

तिहार कारागृहाच्या सहाय्यक जेलरने सोमवारी फोनवर सत्र न्यायालयाला राजनला कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांनी एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजन याला न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही. कारण, राजन कोरोना पॉझिटिव्ह आला असून उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कळवले.

मुंबई बॉम्बस्फोटांनंतर थेट दाऊदशी पंगा घेतल्याने चर्चेत आलेला छोटा राजन

  • छोटा राजनच्या गुन्हेगारी कारकीर्दीची सुरुवात मुंबईतील टिळक नगरमधून झाली.
  • तेथे तो सुरुवातील चित्रपटांच्या तिकिटांचे ब्लॅक करत असे.
  • त्यानंतर त्याच्या कारवाया आणि गुन्हेगारी जगतातील संपर्क वाढत गेला.
  • पुढे तो त्यावेळी मुंबईत वाढू लागलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीत काम करु लागला.
  •  १९९३मध्ये दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर राजन दाऊदपासून वेगळा झाला.
  • छोटा राजनने मुंबईतील बॉम्बस्फोटांचा बदला घेण्यासाठी दाऊदला संपवण्याचे प्रयत्न केले.
  • दहशतवादी कारवाया करणाऱ्या माफिया डॉनविरोधात आपण लढत असल्याचे दाखवत माफिया न म्हणून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता.
  • तो १९९३ मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या हत्यांमुळे तो तसा चर्चेतही आला.
  • त्याला माफिया डॉन संबोधलेले आवडत नाही, त्याचा तो विरोध करतो.
  • राजनवर खंडणी आणि हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत.
  • २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आले आहे.
  • २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
  • गेल्या आठवड्यात मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हनीफ कडवालाच्या हत्येप्रकरणी राजन आणि त्याच्या साथीदारांना निर्दोष मुक्त केले.

Tags: Chhota Rajancorona positiveकोरोनाछोटा राजनतिहार कारागृह
Previous Post

कोरोना उपचारासाठी आयुर्वेद, युनानी उपचारपद्धतीची नवी सरकारी नियमावली

Next Post

नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! – उच्च न्यायालय

Next Post
high court mumbai

नागरिकांनीही कोरोना सुरक्षेचं भान ठेवावं, राजकारण्यांनी नियम मोडणाऱ्यांसाठी प्रभाव वापरू नये! - उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!