मुक्तपीठ टीम
एखादी मुलगी हसली किंवा गोड वागली की ती आपल्याला पटली असा काहींचा समज असतो. मग यातून काही गैरकृत्य घडतात. यामुळेच आता मुंबई उच्च न्यायालयाने यावर महत्वपुर्ण टिप्पणी केली आहे. एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना, उच्च न्यायालयाने मुलगी मैत्रीपूर्ण वागली म्हणजे तिने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती दिली आहे, असा होत नाही, असे म्हटले आहे.
लग्नाचे आमिष दाखवत केला बलात्कार!
- आरोपी आशीष शेलार याने आपल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवत सक्ती करून बलात्कार केला एवढ्यावरच न थांबता ही महिला गर्भवती राहिली.
- या आरोपीने लग्नाचे वचनही पाळले नाही.
- यामुळे संबंधित पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
- त्यानुसार पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याने अटकेच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.
न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात काय म्हटले?
- तक्रारदार महिलेने संमतीने शरीरसंबंध ठेवले, असा दावा करत आरोपीने अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती केली.
- मात्र, न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर आरोपीची विनंती फेटाळून लावली.
- ‘केवळ मैत्रीपूर्ण वागल्याने शरीरसंबंध ठेवण्यासाठी संमती असल्याचे गृहीत धरले जाऊ शकत नाही.
- त्यामुळे आरोपीने शरीरसंबंधाला संमती देण्यासाठी सक्ती केली का, याचीही अधिक चौकशी पोलिसांकडून होणे आवश्यक आहे’, असे न्यायमूर्ती आपल्या आदेशात म्हणाले.