Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा…पण घाई करू नका!

मुंबई मनपाचे नागरिकांना आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vaccination

मुक्तपीठ टीम

एक मार्च पासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत ६० वर्षांवरील सर्व, तसेच ४५ वर्षांवरील सहविकार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. पालिकेने या मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी पाच लसीकरण केंद्रे आणि तीन खासगी रुग्णालये ठरवली आहेत आहेत परंतु कोविन अ‍ॅपवरील नोंदणीत त्रुटी असल्यामुळे लोकांनी नावे नोंदवावीक परंत लस घेण्यासाठी जाण्यास घाई करू नये असे आवाहन केले आहे.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. नागरिक स्वतःची स्वत: नोंदणी करू शकतात, परंतु कोविन पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत लसीकरणासाठी गर्दी करू नये अशी विनंती आहे.”

या टप्प्यातील लसीकर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राबविले जाईल. सार्वजनिक आरोग्य योजना तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्या आरोग्य विमा योजना राबविणार्‍या खासगी रुग्णालयांना लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले जात आहे. सदर रुग्णालयांमध्ये शासकीय नियमांनुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे संभाव्य विपरीत परिणाम, व्यवस्थापन इत्यादींसाठी सुविधा उपलब्धता या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. त्यानंतर टप्या टप्याने सदर केंद्रांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येत आहे.

बारा खाजगी रुग्णालयांनाही लसीकरणात सहभागी करण्यात आले आहे. तेथे त्यांचे कर्मचारीच लस घेऊ शकतील. ही रुग्णालये इतर आरोग्य आणि कोरोना योद्ध्या कर्मचार्‍यांना लस देऊ शकतात की नाही याचा निर्णय राज्य सरकारच्या धोरणाच्या आधारे घेतला जाण्याची शक्यता आहे.


Tags: BMCsuresh kakanivaccinationकोरोना लसीकरणकोविन अ‍ॅपबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई महानगरपालिकालसीकरणसुरेश काकणी
Previous Post

मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?

Next Post

काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी…काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!

Next Post
anand sharma

काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी...काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!