Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी…काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anand sharma

मुक्तपीठ टीम

 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबरच इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षासोबत केलेली युती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयएसएफ हा पक्ष तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या एका कट्टरपंथी नेत्याने स्थापन केला आहे. अशा पक्षाशी काँग्रेसने युती करणे काँग्रेसच्याच काही नेत्यांना खुपले आहे.

 

काँग्रेसमधील गांधींविरोधी ‘जी-२३’ या असंतुष्ट नेत्यांच्या गटातील आनंद शर्मा यांनी तर या नव्या युतीच्या निर्णयावर उघड टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “आयएसएफसारख्या पक्षाशी युती हे कॉंग्रेसच्या गांधीवादी विचारांच्या आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत विचारांच्या विरोधात आहे”. आनंद शर्मा यांच्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना जबाबदारी झटकत पक्षश्रेष्ठींवर ढकलली आहे, “आम्ही एका राज्याचे प्रमुख आहोत. परवानगीशिवाय स्वत: हून कोणताही निर्णय घेत नाही. हा निर्णय पक्षाच्या प्रमुखांचाच आहे”.

 

Congress cannot be selective in fighting communalists but must do so in all its manifestations, irrespective of religion and colour. The presence and endorsement West Bengal PCC President is painful and shameful, he must clarify.

— Anand Sharma (@AnandSharmaINC) March 1, 2021

 

यावेळी कॉंग्रेस पक्ष आयएसएफ आणि डाव्यांसोबत बंगालमध्ये निवडणूक लढवणार आहे. आयएसएफला ३० जागा देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शर्मा म्हणाले की, “आयएसएफसारख्या कट्टरपंथी पक्षाशी युती करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या निर्णयाला कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने मान्यता दिली पाहिजे होती. सीडब्ल्यूसी म्हणजेच काँग्रेस कार्य समिती ही पक्षाशी संबंधित सर्वात मोठी निर्णय घेणारी संस्था आहे.”. शर्मा हे सीडब्ल्यूसीचे सदस्य आणि राज्यसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आहेत.

 

या जागांवर कॉंग्रेस निवडणूक लढवेल

कॉंग्रेस आणि डाव्यांमध्ये येत्या निवडणूकीतील जागांवर वाटाघाटी झाली. अधीर रंजन चौधरी म्हणाले की,” कॉंग्रेस ९२ जागांवर निवडणूक लढवेल. उमेदवारांची यादी २ दिवसात जाहीर केली जाईल. आम्ही सुरुवातीला १३० जागा मागितल्या आहेत. आम्ही आरजेडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी जागा ठेवण्यास इच्छीत होती. आता आम्हाला त्यांना जागा वाटण्याची गरज नाही, पण आमची ऑफर इतर पक्षांसाठी खुली आहे”.

 

शर्मा ‘जी-२३’चे सदस्य

माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा हे ज्या २३ नेत्यांपैकी आहेत ज्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नेत्यांना ‘जी -२३’ असे नाव देण्यात आले आहे. या गटाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष संघटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली होती.

‘आयएसएफ’ वादग्रस्त का?

  • ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा बंगालमधील सर्वात नवा पक्ष आहे.
  • या पक्षाचे प्रमुख ३४ वर्षांचे पिरजादा अब्बास सिद्दीकी हे आहेत.
  • ते हुगळी जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ या मुस्लीम धर्मीयांमधील प्रभावशाली कुटुंबातील आहेत.
  • मुस्लिम मतदारांवर पिरजादा यांचा चांगला प्रभाव मानला जातो.
  • ते एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते.
  • परंतु त्यांनी तृणमूलची साथ सोडत ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा पक्ष स्थापन केला आहे.

Tags: Congressआयएसएफइंडियन सेक्युलर फ्रंटकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मातृणमूल काँग्रेस
Previous Post

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा…पण घाई करू नका!

Next Post

#व्हाअभिव्यक्त “बँकांचं खासगीकरण आणि दत्तूचं भविष्य”

Next Post
Bank strike

#व्हाअभिव्यक्त "बँकांचं खासगीकरण आणि दत्तूचं भविष्य"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!