Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर का?

काँग्रेसचा सवाल: देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याने गैरहजर राहिले का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MKM -1

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षण विधेयकाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली तर त्यात पक्षपात कसा, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेश महासचिव व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला केला आहे. महत्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद त्यांच्या सोयीनुसार वेळ बदलूनही गैरहजर राहिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी तसे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून केले का? असा सवालही त्यांनी केला आहे.

येत्या ८ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमिवर रविवारी महाविकास आघाडी सरकारने आयोजित केलेल्या बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिल्याबाबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर संशय व्यक्त करत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मुळातच राज्य सरकारने मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील प्रकरणावर आयोजित बैठकीला एका केंद्रीय मंत्र्याने दांडी मारणे चुकीचे आहे. त्यांच्या सोयीसाठी म्हणून दुपारी १२.३० वाजताची नियोजित बैठक ४ वाजता करण्यात आली. तरीही रविशंकर प्रसाद बैठकीला उपस्थित झाले नाहीत.

मराठा आरक्षण बैठकीला हजर राहणे पक्षपात कसा?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या गैरहजेरीबाबत दिलेले स्पष्टीकरण तर अधिकच संतापजनक आहे. या बैठकीला केंद्र सरकारचे मंत्री उपस्थित राहिले असते तर ते एका बाजुने असल्याचा संदेश गेला असता, हे फडणविसांचे विधान आश्चर्यास्पद आहे. फडणवीस यांनी सांगितल्यामुळेच रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले का?

मराठा आरक्षण हा खासगी वाद नाही!

सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचे प्रकरण म्हणजे एखाद्या खासगी मालमत्तेबाबत दोन व्यक्तींचा वाद नव्हे; तर हा भारतीय संघराज्यातील एका राज्याने घटनादत्त अधिकारांच्या आधिन राहून आणि विहित संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळात सर्वसंमतीने पारित करून घेतलेल्या एका विधेयकाचा प्रश्न आहे. मुळातच केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडायची हा नंतरचा भाग आहे. पण किमान राज्य सरकारचे नेमके काय म्हणणे आहे, ते ऐकून घेण्याचे सौजन्य तरी केंद्रीय विधी व न्याय मंत्र्यांनी दाखवायला हवे होते, असे सचिन सावंत पुढे म्हणाले.

केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक अशी वागणूक?

खरे तर केंद्रातील भाजपच्या सरकारने आजवर स्वतःच मराठा आरक्षण प्रकरणी पुढाकार घेऊन मदतीची भूमिका घ्यायला हवी होती. कारण हे विधेयक तत्कालीन भाजपच्या राज्य सरकारच्या विनंतीवरून विधानसभा व विधान परिषदेतील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने विनाचर्चा मंजूर केले होते. परंतु, आज राज्यात भाजपचे सरकार नसल्याने केंद्राकडून जाणिवपूर्वक अशी वागणूक दिली जाते आहे का, असाही प्रश्न काँग्रेस प्रवक्त्यांनी उपस्थित केला.

पाटील-मेटे उघडे पडले!

मोदी सरकारच्या काळात झालेली १०२ वी घटना दुरूस्ती व आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेबाबत इंद्रा साहनी प्रकरणाचा निवाडा, हे दोन मराठा आरक्षणातील मोठे पेच आहेत. हे पेच सोडवण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रविवारच्या बैठकीत वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया यांनीसुद्धा हेच सांगितले. यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही, असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व भाजपचे आमदार विनायक मेटे उघडे पडले, असे सचिन सावंत पुढे म्हणाले. किमान आता तरी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी केंद्र सरकारकडे आपले वजन खर्ची करून सर्वोच्च न्यायालयात त्यांना मराठा आरक्षणासाठी अनुकूल अशी भूमिका घेण्यास भाग पाडावे, असे सावंत यांनी सांगितले.

 


Tags: BJPCongressMaratha Reservationकाँग्रेसभाजपामराठा आरक्षण
Previous Post

पूजा चव्हाणचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतोय?

Next Post

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा…पण घाई करू नका!

Next Post
vaccination

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा...पण घाई करू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!