Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वे : एक्स्प्रेस गाड्यांच्या अपघाताचा लोकल प्रवाशांनाही ताप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Central Railway Accident

मुक्तपीठ टीम

आज शनिवार असूनही मध्य रेल्वेच्या प्रवासांना प्रचंद गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात शु्क्रवारी रात्री दोन एक्स्प्रेस गाड्यांची टक्कर झाली होती आणि याचा फटका मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले होते. यापैकी दोन डबे पु्न्हा रुळावर आणण्यात यश मिळाले आहे. तर अद्याप एक डबा रूळाच्या खाली आहे. हा डबा पुन्हा रूळावर आणण्यासाठी काही अवधी जाऊ शकतो. मध्य रेल्वेने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, दुपारनंतर वाहतूक व्यवस्थित सुरू होण्याचा अंदाज आहे.

 

दुपारनंतर वाहतूक व्यवस्थित सुरू होण्याचा अंदाज

  • मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • अपघात झाल्याचे समजताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
  • रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.
  • मध्य रेल्वेने सकाळी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.
  • ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
  • भायखळा ते माटुंगा दरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
  • तर, मुंबईबाहेरून येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन दादरपर्यंतच चालवण्यात आल्या.

 

अपघातामुळे लोकलवर परिणाम-

  • मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसचे तीन डबे घसरले होते.
  • शुक्रवारी रात्री हा अपघात झाल्यानंतर अजूनही रेल्वे सेवा पूर्ववत झालेली नाही.
  • घसरलेल्या एक्सप्रेसचे दोन डबे रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
  • तर एक डब्बा रेल्वे रुळावर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
  • त्यामुळे त्याचा लोकल सेवेवर अजूनही परिणाम झालेला आहे.
  • अप जलद मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.
  • सकाळी ८.१०. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणार्‍या काही लोकल आणि सीएसएमटी/दादरकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस आता अप फास्ट मार्गावर नेल्या जातील. ८.२९ वाजता अप मार्गावरून (२२१०८)लातूर एक्स्प्रेस रवाना झाली आहे.
  • डाऊन जलद वाहतूक भायखळा-माटुंगा मार्गे वळवली जात आहे.
  • तर डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तासांचा अवधी लागणे अपेक्षित आहे.
  • त्यामुळे आज दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
  • धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणे दहा वाजता बंद करण्यात आल्या होत्या.
  • पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली होती.

Tags: Central RailwayMatunga StationMumbai localमध्य रेल्वेमाटुंगा स्थानकमुंबई लोकल
Previous Post

“आनंदी जीवनासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम गरजेचा”

Next Post

दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’

Next Post
Shashikant Kamble

दलित पँथरतर्फे शशिकांत कांबळे यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!