Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आनंदी जीवनासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम गरजेचा”

डॉ. कल्याण गंगवाल यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे 'सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार' प्रदान

April 16, 2022
in विशेष
0
Dr. Kalyan Gangwal; Awarded with 'Suryadatta Dhanvantari Award'

मुक्तपीठ टीम

शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना पहिला ‘सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्यकीय, शाकाहाराचा प्रसार आणि व्यसनमुक्ती कार्यातील डॉ. गंगवाल यांच्या भरीव योगदान प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांना या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.
Dr. Kalyan Gangwal; Awarded with 'Suryadatta Dhanvantari Award'
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडीया यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष आणि सचिव सुषमा चोरडीया, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता डॉ. प्रतिक्षा वाबळे, डॉ. सिमी रेठरेकर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गंगवाल यांनी ‘उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी’ यावर मार्गदर्शन केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “महाराष्ट्रात घरात बनवले जाणारे शाकाहारी जेवण सर्वोत्तम अन्न आहे. हा संतुलित आहार असून, त्यातून शरीराला कार्बोहायड्रेटस, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे आवश्यक सगळे घटक मिळतात. सूर्यास्ताच्या आधी रात्रीचे जेवण घ्यायला हवे. शाकाहार हा आता जगभरात प्राधान्य दिला जाणारा आहार आहे. आयुष्यात आपले शरीर आणि आरोग्य उत्तम ठेवणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आरोग्य चांगले असेल तर सगळी ध्येय पूर्ण करणे शक्य होते. आनंदी जीवन जगता येते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्त, ताणविरहित जीवन, पर्यावरण संतुलन, अध्यात्माची जोड देणे गरजेचे आहे.
डॉ. संजय चोरडीया यांनी आरोग्याचे महत्त्व सांगताना आपले विद्यार्थी व कर्मचारी यांना उत्तम आरोग्यासाठी स्वत:कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. सूर्यदत्त परिवाराला सातत्याने मार्गदर्शन करत असल्याबद्दल डॉ. गंगवाल यांचे आभार मानले. पर्यावरण संतुलन आणि सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारांत सायकलचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. चोरडीया यांनी यावेळी केले.

Tags: Dr Kalyan GangwalSurya Dutta Dhanwantri AwardSurya Dutta Edication Foundationडॉ. कल्याण गंगवालसूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनसूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार
Previous Post

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा

Next Post

मध्य रेल्वे : एक्स्प्रेस गाड्यांच्या अपघाताचा लोकल प्रवाशांनाही ताप

Next Post
Central Railway Accident

मध्य रेल्वे : एक्स्प्रेस गाड्यांच्या अपघाताचा लोकल प्रवाशांनाही ताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!