मुक्तपीठ टीम
गुगल सर्च ऑन इव्हेंट २०२२ दरम्यान गुगलने, मॅप प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फिचर्स जोडण्याबाबत माहिती दिली आहे. गुगल मॅप अॅप वापरत असाल, तर या अपडेट्सनंतर एक चांगला अनुभव मिळेल. या इव्हेंटमध्ये, कंपनीने सांगितले की, नवीन अपडेटनंतर, हे अॅप यूजर्ना वास्तविक जगाचा अनुभव देण्यास सक्षम असेल. गुगल सध्या व्हिज्युअल आणि साधा नकाशा तयार करण्याचे काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख बदलांचा समावेश आहे.
गुगल मॅपचा जबरदस्त इमर्सिव्ह मॅप व्ह्यू फिचर
- गुगलने यावर्षी यूजर्सना इमर्सिव्ह व्ह्यू फिचरबद्दल जागरूक केले आहे.
- या फीचरच्या मदतीने आता यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर हवामान आणि ट्रॅफिक यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घरी बसून घेऊ शकतील.
- या फिचरच्या मदतीने, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरच कोणत्याही ठिकाणाचे मल्टी डायमेंशन व्ह्यू पाहू शकाल.
जर कोणाला प्रवासाची आवड असेल तर गुगल मॅपचे हे नवीन फिचर खूप उपयुक्त ठरू शकते. या फिचरच्या मदतीने कुठे फिरायला जात असाल तर तिथे कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत हे आधीच शोधू शकाल. आता तुम्हाला ज्या ठिकाणाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणाची माहिती याद्वारे आधीच मिळेल. हे फिचर सुरू केल्यानंतर यूजर्सना गुगल मॅप्स कम्युनिटी फिचरद्वारे त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती काढता येणार आहे.
गुगल मॅपवर लाइव्ह व्ह्यू फीचर देखील वापरता येणार
- गुगलने अनेक वर्षांपूर्वी एक फिचर सादर केले होते जे यूजर्सना थेट व्ह्यूसह दिसेल.
- या फिचरच्या मदतीने, यूजर कोणत्याही ठिकाणी गेल्यास त्याच्या जवळचे एखादे रेस्टॉरंट शोधू शकेल.
- अशा परिस्थितीत यूजर लाईव्ह व्ह्यू फीचर वापरू शकतो आणि ते ठिकाण सहज शोधू शकेल.