Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इरडाईच्या ई-पॉलिसी संदर्भात मार्गदर्शक सूचना, डिजिटलायझेशनच्या काळात सर्व विमा पॉलिसी डिजिटल करणे आवश्यक!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Irdai

मुक्तपीठ टीम

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडाईने सर्व विमा पॉलिसी डिजिटल स्वरूपात अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, सर्व नवीन पॉलिसी केवळ इलेक्ट्रॉनिक म्हणजेच डिजिटल स्वरूपात जारी केल्या जातील. यासोबतच, विमा कंपन्यांना विद्यमान पॉलिसीधारकांना ई-विम्याची सुविधा प्रदान करण्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.

ग्राहकाने थेट इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून पॉलिसी खरेदी केल्यास विमा कंपन्यांनी सवलत द्यावी, असेही इरडाईने म्हटले आहे. या प्रस्तावित मार्गदर्शक सूचनेबाबत २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित भागधारकांकडून सल्ला मागवण्यात आला आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या ई-पॉलिसी संदर्भात मार्गदर्शक सूचना!

  • इरडाईने अलीकडेच ई-पॉलिसी जारी करण्याच्या विद्यमान नियमांचे पुनरावलोकन केले. त्यात काही बदलही सुचवले आहेत.
  • २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात इरडाईने सांगितले की, विमा व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विमा कंपन्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सक्षम करण्यासाठी एक योग्य फ्रेमवर्क तयार करणे आवश्यक आहे.
  • यामध्ये फिजिकल फॉर्मसोबतच ई-फॉर्मही कंपन्यांना द्यावा लागणार आहे.
  • प्रत्येक विमा कंपनी सर्व विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करेल.
  • विमा मध्यस्थामार्फत थेट प्राप्त झालेला ई-प्रस्ताव केवळ इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे मंजूर केला जाईल.
  • विमा कंपन्यांना कोणतीही माहिती भौतिक स्वरूपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात हस्तांतरित करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागते.

डिजिटलायझेशननंतर ई-विमा खाते अनिवार्य असणाार

  • सर्व पॉलिसीधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक विमा खाते अनिवार्य असेल.
  • पॉलिसीधारकांना जारी केलेली पॉलिसी ईलेक्ट्रॉनिक इन्शोरन्स अकाउंटमध्ये ठेवावी लागते.
  • प्रत्येक विमा कंपनीकडे ईलेक्ट्रॉनिक इन्शोरन्स अकाउंट क्रमांक तयार करण्यासाठी एक उपकरण असले पाहिजे.
  • विमा कंपन्यांना ई-विमा पॉलिसीची एक प्रत आणि ऑफर फॉर्म, फायदे आणि इतर संबंधित कागदपत्रे ग्राहकांच्या ईमेलवर पाठवावी लागतील.

प्रत्येक विमा कंपनी, ईलेक्ट्रॉनिक इन्शोरन्स अकाउंटला इलेक्ट्रॉनिक पॉलिसी जारी केल्यावर, पॉलिसीधारकांना ईमेल आयडी, मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे सूचित करेल. ते हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये द्यावे लागेल. विमा कंपन्यांना हा नियम लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्व विद्यमान पॉलिसीधारकांचे ई-पॉलिसीमध्ये रूपांतर करण्याची सुविधा द्यावी लागेल.

पाहा:


Tags: Digital Insurance PolicyDigitizationE-Policygood newsInsurance Regulatory and Development Authority of IndiaIRDAImuktpeethइरडाईई-पॉलिसीउपयोगी बातमीचांगली बातमीडिजिटल विमा पॉलिसीडिजिटलायझेशनभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणमुक्तपीठ
Previous Post

मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये ३ कोटी ३४ लाख ऑर्डर्स! २० हजार विक्रेते लक्षाधीश!

Next Post

गुगल मॅपचा अपडेट: मल्टी डायमेंशन व्ह्यूने घरातूनच मिळवा प्रत्यक्ष जगात वावरण्याचा आनंद!

Next Post
Google Map Update

गुगल मॅपचा अपडेट: मल्टी डायमेंशन व्ह्यूने घरातूनच मिळवा प्रत्यक्ष जगात वावरण्याचा आनंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!