मुक्तपीठ टीम
आजच्या काळात मोबाईल हे फसवणुकीचे मोठे साधन बनले आहे. मोबाईलवर फोन करून फसवणूक व इतर प्रकारचे गुन्हे केले जात आहेत. बनावट मोबाईल क्रमांकामुळे फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवणे कठीण होते. फेक कॉल करणाऱ्यांना पकडता यावे यासाठी सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार ही फसवणुकी टाळण्यासाठी केवायसी आधारित प्रणाली तयार करत आहे.
मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू होणार…
- सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एक नवीन प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे.
- ज्यामध्ये मोबाईल नंबर त्याच्या फोटोसह दिसेल.
- आता सरकार मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करणार आहे.
- यासाठी सरकार दोन प्रकारची व्यवस्था राबवू शकतो.
- एक आधार कार्ड आधारित आणि दुसरे सिम कार्ड आधारित.
आधार कार्ड आधारित KYC म्हणजे काय?
- ट्रायच्या नवीन प्रणाली अंतर्गत, सर्व मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केले जातील.
- जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे फक्त कॉल करणाऱ्याचा मोबाईल नंबर नसेल तर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील असेल.
- हे तेच नाव असेल जे आधार कार्डमध्ये असेल.
सिम कार्ड आधारित KYC म्हणजे काय?
- सिमकार्ड खरेदी करताना ग्राहकाने दिलेल्या कागदपत्राच्या आधारे कॉलिंगसोबत त्याचा फोटो जोडला जाईल.
- सिम खरेदी करताना ठेवलेला फोटो कॉलिंग दरम्यान प्रदर्शित होईल.
- अशा प्रकारे, बनावट लोक ओळखले जाऊ शकतात.