Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीडच्या नांदुरघाटात ८५ कोटींच्या विकास कार्यात भ्रष्टाचाराचा आरोप, मनसेच्या सुमंत धसांचा आंदोलनाचा दणका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mns Agigation

मुक्तपीठ टीम

केज तालुक्यातील नांदूरघाट येथे मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांचे मागील तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. नांदूरघाट गटात विकास कामाच्या नावावर झालेल्या जवळपास ८५ कोटी रुपयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमावी, नांदूरघाट येथे पाणी पुरवठा सुरू करावा, शिरूरघाट येथे पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी, नांदूरघाट ग्रामपंचायत मार्फत झालेल्या कामाची चौकशी करावी, खाडेवाडी व खोमणेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र द्यावे. नांदूरघाट गटातील अनेक रस्त्यांचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करून त्या रस्त्याना इतर जिल्हा मार्ग क्रमांक द्यावा यासह नांदूरघाट गटातील महत्त्वाच्या विषयासाठी मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस हे नांदूरघाट येथे २९ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलनास बसले होते.

नांदूरघाट येथे सुमंत धस यांच्या अन्नत्याग आंदोलनास आंदोलन नांदूरघाट गावातील व गटातील नागरिक पाठिंबा देत आहेत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केज तालुका, वंचित बहुजन आघाडी,लहुजी शक्ती सेना केज तालुका,आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर,पत्रकार अमोल जाधव,श्रीकांत जाधव,जेष्ट पत्रकार अशोक तारळकर,संजय नवले, शिवाजी जाधव, धनंजय रणदिवे, तुकाराम जाधव, शेख बाबूभाई, माजी मुख्यध्यापक संभाजी हंगे यांच्या सह सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दर्शवला होता. तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारीयांच्या लेखी आश्‍वासनानंतर सुमंत धस यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.

 

आंदोलन दरम्यान मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष श्री सुमंत धस ह्यांचा रक्तदाब खालावला, नांदूरघाट सरकारी रुग्णालयात उपचार सुरू…

काळजी घ्या @sumant_dhas pic.twitter.com/Q7FrDOwmli

— MNS Report | मनसे रिपोर्ट (@mnsreport9) December 2, 2021

तीन दिवस आंदोलन केल्या मुळे सुमंत धस यांची प्रकृती खलावली होती,अन्नत्याग आंदोलना मुळे सुमंत धस यांचा रक्तदाब नव्वद बाय साथ ने कमी झाला होता त्या मुळे त्यांना उपचारा साठी नांदूरघाट ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. दोन दिवसाच्या उपचारा नंतर त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यांना डीचार्ज देण्यात आला आहे.


Tags: agitationbeedmansesumant dhasअन्नत्याग आंदोलनमनसेसुमंत धस
Previous Post

मुंबई आणि नवी मुंबईतल्या बिल्डर समूहावर आयकर छापे, शेकडो कोटींचा गैरव्यवहार!

Next Post

एनसीपी विरुद्ध एनसीबी: राज्य पोलिसांकडील ५ मोठे गुन्हे एनसीबीकडे देण्यावरून नवा वाद

Next Post
ncp vs ncb

एनसीपी विरुद्ध एनसीबी: राज्य पोलिसांकडील ५ मोठे गुन्हे एनसीबीकडे देण्यावरून नवा वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!