Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीपी विरुद्ध एनसीबी: राज्य पोलिसांकडील ५ मोठे गुन्हे एनसीबीकडे देण्यावरून नवा वाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ncp vs ncb

मुक्तपीठ टीम

प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून एनसीबीचे झोनल युनिट महाराष्ट्रात खोट्या केसेस करुन खंडणी उकळण्याचा धंदा करत असल्याचे सिध्द झाले असतानाच टॉप – ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. त्यामुळे एनसीपी आणि एनसीबीमध्ये नवा वाद भडकण्याची शक्यता आहे. मलिक यांनी ५ केसेस ट्रान्स्फर करण्याची मागणी होते, हे का करण्यात येतेय याचं उत्तर केंद्रसरकारने द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच टॉप – ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम… चार ग्रॅम… तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार, असा खोचक प्रश्नही विचारला आहे.

 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार राज्यसरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील टॉप – ५ केसेस एनसीबीकडे देण्यात याव्यात असे पत्र महाराष्ट्राच्या डीजींना एनसीबीच्या डीजीने दिले असल्याचे समोर आल्यावर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर हल्लाबोल केला आहे. टॉप – ५ केसेसचा निकष दोन ग्रॅम… चार ग्रॅम… तीन टन की जास्त प्रसिद्धी मिळालेल्या केसेस असणार आहे? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

 

राज्यसरकार आपल्या युनिटच्या माध्यमातून कारवाई करतेय. जेवढं काम एनसीबीला करता येत नाही त्याच्या कितीतरी पटीने राज्यसरकारच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने काम केले आहे. तुमचं युनिट आहे तर काम करा. काम करत नसेल तर एनसीबीचे युनिट बंद करा असेही नवाब मलिक म्हणाले.

 

राज्यसरकारचा अधिकार संपवण्याचा प्रयत्न केसेस ट्रान्स्फर करुन केला जातोय की एनसीबीमध्ये खंडणी उकळण्याचा धंदा सुरू होता आणि आता टॉप – ५ केसेसच्या माध्यमातून आणखी खंडणी उकळण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

 

आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा… तुमची संस्था खरंच काम करतेय तर त्या २६ बोगस तयार करण्यात आलेल्या केसेसची चौकशी कधी होणार? निरपराध लोकांना फसवून अटक केली त्यांना कधी सोडणार याचे उत्तर द्या अशी प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.


Tags: drug casesmuktpeethNawab MalikNCBNCPstate governmentअल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकएनसीपीएनसीबीड्रग्स रॅकेटमुक्तपीठराज्यसरकार
Previous Post

बीडच्या नांदुरघाटात ८५ कोटींच्या विकास कार्यात भ्रष्टाचाराचा आरोप, मनसेच्या सुमंत धसांचा आंदोलनाचा दणका

Next Post

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा न करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे!

Next Post
Dadaji Bhuse

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा न करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!