Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई आणि नवी मुंबईतल्या बिल्डर समूहावर आयकर छापे, शेकडो कोटींचा गैरव्यवहार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
raid on mumbai navi mumbai builder group

मुक्तपीठ टीम

निवासी आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका बांधकाम उद्योग समूहाच्या मुंबई आणि नवी मुंबईतील मालमत्तांवर २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राप्तिकर विभागाकडून छापे घालण्यात आले. हा समूह मुख्यत्वे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. या शोधमोहिमेत सुमारे 30 सकुलांवर छापे घालण्यात आले.

 

या तपासादरम्यान या समूहाकडून कर चुकवण्यासाठी अवलंबलेले विविध प्रकार उघडकीला आले. विविध कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले आणि सदनिकांच्या विक्री व्यवहारातील रकमेचा भाग म्हणून सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम प्राप्त झाल्याचे दर्शवत असलेल्या आणि ज्यांचा समावेश नियमित खातेवहीच्या हिशोबात समाविष्ट नव्हता अशा पावत्या जप्त करण्यात आल्या. त्याच प्रकारे अशा व्यवहारांवर घेण्यात आलेल्या ऑन मनीच्या पावत्यांबाबतही फेरफार झाल्याचे आढळले. ग्राहकांना ऑन मनीच्या मूल्याची प्रॉमिसरी नोट देणे आणि सदनिकेची नोंदणी झाल्यावर या प्रॉमिसरी नोट नष्ट करणे अशा प्रकारच्या पद्धतींचा अवलंब या समूहाकडून होत होता.

 

या बांधकामाच्या वेळी या झोपड्यांमधील मूळ भाडेकरुंना त्यांच्या जागा रिकामी करण्यासाठी त्याचबरोबर इतर व्यक्तींना झोपडीधारकांच्या जागा रिकामी करण्यामध्ये मदत केल्याबद्दल बेहिशोबी रोख रकमेचे चुकारे दिल्याचे आक्षेपार्ह पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत. त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आणि अनियमिततांचे देखील पुरावे सापडले आहेत.

 

प्राथमिक छाननीत असे दिसून आले की या समूहाने एका कंपनीत रोख रक्कम भरून कंपनीवर नियंत्रण राखण्याइतपत महत्त्वाचे समभाग प्राप्त केले होते. त्याच प्रकारे टीडीएसच्या तरतुदींच्या अनुपालनातही गैरव्यवहार आढळले आहेत. या समूहाने ज्या चुकाऱ्यांचे दावे केले आहेत त्यापैकी काही विशिष्ट व्यवहारांमध्ये टीडीएस कापलेलाच नाही आणि त्याचे एकूण मूल्य सुमारे ३०० कोटी रुपये आहे. या तपासादरम्यान ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


Tags: builder groupIT departmentmumbainavi mumbaiनवी मुंबईनिवासी आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रप्राप्तिकर विभागबांधकाम उद्योग समूहमुंबई
Previous Post

जरी आहे उपमुख्यमंत्री तरी…जिल्हा बँकेची सत्ताच न्यारी!

Next Post

बीडच्या नांदुरघाटात ८५ कोटींच्या विकास कार्यात भ्रष्टाचाराचा आरोप, मनसेच्या सुमंत धसांचा आंदोलनाचा दणका

Next Post
mns Agigation

बीडच्या नांदुरघाटात ८५ कोटींच्या विकास कार्यात भ्रष्टाचाराचा आरोप, मनसेच्या सुमंत धसांचा आंदोलनाचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!